मेल गिब्सनला होतोय ‘त्या’ गोष्टींचा पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 20:44 IST2016-10-18T20:44:03+5:302016-10-18T20:44:03+5:30
हॉलीवूड दिग्दर्शक-अभिनेता मेल गिब्सन आणि वाद एकमेकांचा पिछा कधीच सोडत नाही. सतत वादात राहणाऱ्या गिब्सनला मात्र आता त्याच्या वागण्याचा ...

मेल गिब्सनला होतोय ‘त्या’ गोष्टींचा पश्चाताप
ह लीवूड दिग्दर्शक-अभिनेता मेल गिब्सन आणि वाद एकमेकांचा पिछा कधीच सोडत नाही. सतत वादात राहणाऱ्या गिब्सनला मात्र आता त्याच्या वागण्याचा खूप पश्चाताप होतोय. हे आम्ही नाही तर तो स्वत: सांगतोय.
‘ब्रेव्हहार्ट’ स्टार गिब्सन म्हणतो की, ‘गेली दहा वर्षे मी दारूला स्पर्शदेखील केला नाही. पूर्णपणे निर्व्यसनी म्हणून मी स्वत:ला विकसित केले आहे. माझ्या अविचारी वागण्यामुळे माझ्या हातून घडलेल्या असंख्य चुकांचा मला पश्चाताप होतो. परंतु आता मी पूर्णपणे बदललेला व्यक्ती आहे.’
साठ वर्षीय आॅस्कर विजेत्या गिब्सनला २००६ साली दारू पिऊन नशेत गाडी चालविण्यासाठी मॅलिबू येथे अटक करण्यात आली होती. यावेळी पोलिसाला त्याने केलेला शिवीगाळ कॅमेऱ्यात कैद झाला होता. ‘ज्यू-विरोधी’ केलेल्या त्याच्या शेरेबाजीने तो पुरता अडचणीत आला होता.
त्यानंतर २०१० साली गर्लफ्रेंड ओक्साना ग्रिगोरिव्हाने त्याच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला होता. गिब्सनने मला चेहऱ्यावर ठोसा मारून दात पाडले, अशी तिने तक्रार दिली होती. त्याबरोबरच गुपितपणे त्याचा वर्णभेदी शिवीगाळ रेकॉर्ड करून तिने सार्वजनिक केला होता.
![Mel Gibson and Oksana Grigorieva]()
ओक्साना ग्रिगोरिव्हा आणि मेल गिब्सन
‘अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस’च्या साहाय्याने त्याने आता दारूचे व्यसन सोडण्यात यश मिळवले आहे. तो सांगतो, मी दारू पूर्णपणे सोडली आहे. दहा वर्षांपासून मी दारूचा थेंबसुद्धा पिलेला नाही. गतकाळात माझ्या हातून घडलेल्या चुका म्हणजे आयुष्यातील सर्वात वाईट घटना आहेत.
लोकांनी माझी ती बाजू पाहिली आहे. आता माझी चांगली बाजूसुद्धा त्यांना दिसेल. शिस्तीने स्वत:मध्ये मी जाणीवपूर्वक बदल घडवून आणले आहेत. माझ्या खासगी आयुष्यातील गोष्टी उघड करून माझे झालेले चरित्र-हनन माझ्यातील बदलांसाठी कारणी भूत आहे, असे तो सांगायला विसरला नाही.