​मार्टिन स्कॉरसेसीच्या पुढील चित्रपटात रॉबर्ट डीनिरो दिसणार ‘तरुण’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 15:53 IST2017-01-06T15:53:24+5:302017-01-06T15:53:24+5:30

तारुण्य कायम टिकून रहावे असे कोणाला वाटत नाही? नैसर्गिकरीत्या जरी ते शक्य नसले तरी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने असे करणे शक्य ...

Martin Scorsese's next film will see Robert Deñiro 'Tarun' | ​मार्टिन स्कॉरसेसीच्या पुढील चित्रपटात रॉबर्ट डीनिरो दिसणार ‘तरुण’

​मार्टिन स्कॉरसेसीच्या पुढील चित्रपटात रॉबर्ट डीनिरो दिसणार ‘तरुण’

रुण्य कायम टिकून रहावे असे कोणाला वाटत नाही? नैसर्गिकरीत्या जरी ते शक्य नसले तरी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने असे करणे शक्य आहे. त्यामुळेच तर हॉलीवूडमध्ये सध्या दिग्गज कलाकारांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने तरुण बनवून दाखवण्याचा ट्रेंडच आला आहे.

प्रख्यात हॉलीवूड दिग्दर्शक मार्टिन स्कॉरसेसी यांच्या ‘द आयरिशमन’ या  आगामी चित्रपटामध्येसुद्धा हा ट्रेंड पाहायला मिळणार आहे. यामध्ये लिजेंडरी अ‍ॅक्टर रॉबर्ट डीनिरो आणि अ‍ॅल पचिनो यांना सीजीआय तंत्रज्ञानाद्वारे तरुण दाखवण्यात येणार आहे.

चित्रपटाचा निर्माता गॅस्टन पॅव्हलोविचने सांगितले की, ‘हे एक असाधारण तंत्रज्ञान आहे. प्रोस्थेटिक्स किंवा तत्सम मेकअपची गरज नाही. कलाकारांनी केवळ अभिनय करायचा. तंत्रज्ञान त्यांना आपोआप टाईम मशीनप्रमाणे आपल्याला हव्या त्या वयातील त्यांचे रुप दाखवणार. आम्ही केलेल्या चाचण्यामध्ये तरी याला यश आले असून त्याचा वापर करून रॉबर्ट डीनिरोचे त्याच्या २०, ४० आणि ६०व्या वर्षातील रुप दाखवण्यात येणार आहे. उदाहरण द्यायचे तर आमच्या ‘द आयरिशमन’ चित्रपटात तुम्हाला ‘गॉडफादर २’च्या वयातील डीनिरो पाहायला मिळेल.’

अनेक वर्षानंतर स्कॉरसेसी-डीनिरो ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. एेंशी व नव्वदच्या दशकात या विलक्षण दिग्दर्शक-अभिनेत्याच्या जोडीने अनेक महान चित्रपटा एकत्र साकारले. त्यामध्ये ‘रेजिंग बुल’, ‘टॅक्सी ड्राईव्हर’, ‘गुडफेलाज्’, ‘कसिनो’ या सिनेमांची नावे घ्यावी लागतील. 

DeNiro
गॉडफादर २ : रॉबर्ट डीनिरो​

Al Pacino
डॉग डे आफ्टरनून : अ‍ॅल पचिनो

तसेच ‘द आयरिशमन’मध्ये डीनिरो आणि पचिनो हे दोन लिजेंडसुद्धा पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. महान अभिनेत्यांच्या यादीत पॅचिनो मोठा की डीनिरो असा वाद असतो. त्यामुळे हे दोन स्टार्स एकत्र येणार म्हटल्यावर जगभरातील सिनेरसिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी दोघांनी ‘हीट’  आणि ‘रायचस किल’ या चित्रपटांत काम केले होते.

स्कॉरसेसीच्या ‘सायलेंन्स’प्रमाणेच ‘द आयरिशमन’ हा चित्रपटसुद्धा अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. डीनिरो, पचिना, हार्वी किटल आणि जोई पेस्की यासारखी तगडी कास्ट घ्यायची असल्याने त्यांच्या तारखा जुळत नसल्यामुळे स्कॉरसेसी हा चित्रपट अद्याप बनवू शकले नाही. चार्ल्स ब्रँड्ट लिखित ‘अ हर्ड यू पेंट हाऊसेस’ नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.

कंम्प्युटर इफेक्टस्चा वापर करून अलिकडच्या काळात मायकल डग्लस (अँट मॅन), रॉबर्ट डाऊनी ज्यू. (कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर), आणि कॅरी फिशर (रोग वन :  अ स्टार वॉर्स स्टोरी) या कलाकारांना तरुण दाखवण्यात आलेले आहे. ‘द आयरिशमन’मध्ये डीनिरो आणि पचिनोला पुन्हा एकदा तरुण पाहण्यासाठी तुम्हाला २०१८ पर्यंत वाट पाहावी लागेल.

Web Title: Martin Scorsese's next film will see Robert Deñiro 'Tarun'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.