मार्टिन स्कॉरसेसींनी का सोडला फ्रँक सिनात्रा बायोपिकचा नाद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 17:04 IST2017-01-07T17:04:57+5:302017-01-07T17:04:57+5:30

फ्रँक सिनात्रा यांच्या जीवनावर आधारित दीर्घकाळापासून रखडलेला चित्रपट अखेर गुंडाळण्यात आला. दिग्दर्शक मार्टिन स्कॉरसेसी अनेक वर्षांपासून फ्रँक सिनात्रा बायोपिक ...

Martin Scorsese Why Frank Sinatra Biopic Sounds? | मार्टिन स्कॉरसेसींनी का सोडला फ्रँक सिनात्रा बायोपिकचा नाद?

मार्टिन स्कॉरसेसींनी का सोडला फ्रँक सिनात्रा बायोपिकचा नाद?

रँक सिनात्रा यांच्या जीवनावर आधारित दीर्घकाळापासून रखडलेला चित्रपट अखेर गुंडाळण्यात आला. दिग्दर्शक मार्टिन स्कॉरसेसी अनेक वर्षांपासून फ्रँक सिनात्रा बायोपिक बनवू पाहत होते; परंतु अनेक कारणांनी ते शक्य होऊ शकले नाही. त्यामुळे अखेर हार मानून त्यांना हा चित्रपट बनवण्याचा नाद सोडून दिल्याचे जाहीर केले.

‘द डिपार्टेड’ फेम स्कॉरसेसींच्या मनात अल पचिनो मुख्य भूमिकेत तर तर रॉबर्ट डीनिरोला डीन मार्टिनच्या रोलमध्ये घेऊन हा चित्रपट बनविण्याची योजना होती. मात्र सिनात्रा यांच्या कुटुंबियांनी पटकथेतील काही गोष्टींवर हस्तक्षेप घेत प्रोजेक्टला नकार दिला आणि त्यांचे अनेक वर्षांचे स्वप्न भंग पावले.

हताश स्कॉरसेसी म्हणाले की, ‘हा चित्रपट करणे मला शक्य नाही. सिनात्रांच्या कुटुंबियांची परवानगी नसल्यामुळे मी आता या चित्रपटाचा विचार सोडून दिला आहे. माझ्या दृष्टीने त्यांच्या जीवनातील काही नकारात्मक गोष्टी बायोपिक मध्ये दाखवणे गरजेचे आहे जे त्यांच्या कुटुंबाला मान्य नाही. सिनात्रा हे फार गुंतागुंत असणारे व्यक्तिमत्त्व आहे.’

मध्यंतरी त्यांचा फेव्हरेट अ‍ॅक्टर लिओ डिकॅप्रिओसुद्धा या चित्रपटाशी जोडला गेल्याची अफवा उठली होती. परंतु त्याने स्वत:हून नकार देऊन सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला होता. काही वर्षांपूर्वी सिनात्रांची मुलगी टिना या चित्रपटाची कार्यकारी निर्माती म्हणून जोडली गेले; पण पटकथेतील काही गोष्टी तिला चित्रपटात दाखवणे फारसे रुचले नाही.

Frank Sinatra
कम फ्लाय विथ मी : फ्रँक सिनात्रा

फ्रँक सिनात्रा हे अमेरिकेचे एकविसाव्या शतकातील सर्वात लोकप्रिय संगीतकार, गायक, अभिनेते असून त्यांचे संपूर्ण नाव फ्रान्सिस अल्बर्ट फ्रँक सिनात्रा असे होते. त्यांच्या गाण्यांच्या आतापर्यंत जगभरात १५ कोटींहून अधिक रेकॉर्ड्सची विक्री झालेली आहे. ‘इन द वी स्मॉल अवर्स’, ‘साँग्स फॉर स्विंगिंग लव्हर्स’, ‘कम फ्लाय विथ मी’ हे त्यांचे प्रसिद्ध म्युझिक अल्बम आहेत.

त्यांच्या करिअरच्या सुवर्णकाळात सिनात्रांचे अनेक माफियांशी संबंध होते आणि हीच गोष्ट बायोपिकमध्ये दाखवण्यास कुटुंबियांनी हरकत घेतली. अखेर नाईलाजाने स्कॉरसेसी त्यांचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट बनवण्यात अपयशी ठरले. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘द सायलेन्स’ हा चित्रपट अमेरिकेत रिलीज झाला. सतराव्या शतकातील जपानमध्ये बंदी बनवलेल्या ख्रिश्चन पाद्रीला सोडवायला गेलेल्या दोन नव धर्मप्रसारकांचा संघर्ष यामध्ये दाखवण्यात आला आहे.

तसेच स्कॉरसेसी अल पचिना आणि डीनिरोला घेऊन ‘द आयरिशमन’ नावाचा सिनेमा करीत आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून या चित्रपटात सर्व कलाकारांना तरुण दाखवण्यात येणार आहे. बऱ्याच वर्षांपासून स्कॉरसेसींना हा चित्रपट बनवण्याची इच्छा होती. त्यांनी यापूर्वी ‘द वुल्फ आॅफ वॉल स्ट्रीट’, ‘द एव्हिएटर’, ‘गुडफेलाज्’ असे खऱ्या लोकांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. २००६ साली त्यांना ‘द डिपार्टेड’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा आॅस्कर पुरस्कार मिळाला होता.

Web Title: Martin Scorsese Why Frank Sinatra Biopic Sounds?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.