माजिद माजिदींना अखेर मिळाली अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 18:08 IST2017-03-14T12:36:58+5:302017-03-14T18:08:54+5:30

इराणियन दिग्दर्शक माजिद माजिदी यांचा आगामी चित्रपट सध्या चर्चेत आहे.  त्यांनी ‘बियॉण्ड द क्लाउड्स’ या त्यांच्या आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी ...

Majid Mazid finally got actress! | माजिद माजिदींना अखेर मिळाली अभिनेत्री!

माजिद माजिदींना अखेर मिळाली अभिनेत्री!

ाणियन दिग्दर्शक माजिद माजिदी यांचा आगामी चित्रपट सध्या चर्चेत आहे.  त्यांनी ‘बियॉण्ड द क्लाउड्स’ या त्यांच्या आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रीचा चालविलेला शोध आता संपला, असे म्हणायला हरकत नाही. कारण, मालविका मोहनन हिच्या रूपाने त्यांना या चित्रपटासाठी अभिनेत्री मिळाली आहे. ती सिनेमॅटोग्राफर के. यू. मोहनन यांची मुलगी असून, उत्तम थिएटर आर्टिस्ट असल्याचे सूत्रांकडून समजते. 

‘बियॉण्ड द क्लाउड्स’ चित्रपटाचे कथानक भाऊ-बहीण यांच्या सुंदर नात्यावर प्रकाश टाकणारे आहे. सूत्रांनुसार कळते की, माजिदी ज्या भूमिकेचा चेहरा शोधत होते तो चेहरा त्यांना मालविका हिच्यामध्ये सापडला असल्याचे ते सांगतात. ’ ‘चिल्ड्रेन आॅफ हेवन’, ‘कलर आॅफ पॅराडाइज’, ‘बरन अ‍ॅण्ड मेनी मोअर’ या आगळ्यावेगळ्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आहे. माजिदी त्यांच्या प्रत्येक चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी नव्या चेहºयांचा शोध घेत असतात. शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर या चित्रपटाच्या माध्यमातूनच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची मध्यंतरी चर्चा होती. मागच्या महिन्यात त्याने चित्रपटासाठी शूटिंगही सुरू केल्याचे कळाले होते. मालविकाने नुकतेच पहिल्या भागासाठी शूटिंग सुरू केले आहे. 

अधिकृत सूत्रांनुसार,‘ बियॉण्ड द क्लाउड्स या चित्रपटात अभिनेत्री मालविका ही मुख्य भूमिका साकारणार आहे. माजिदी यांनी एक लूक टेस्ट घेतली होती. ज्यात मालविकाची निवड झाली. मुंबईत तिने शूटिंग सुरू केले आहे. 

Web Title: Majid Mazid finally got actress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.