मॅडोनाचा तिरस्कार करतो तिचा मोठा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 20:09 IST2016-11-29T20:09:24+5:302016-11-29T20:09:24+5:30

मॅडोनाची कारकीर्द जेवढी यशस्वी असल्याचे बोलले जाते तेवढीच वादग्रस्त असल्याचेही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यात तिचा कौटुंबिक कलह ...

Madonna hates her older son | मॅडोनाचा तिरस्कार करतो तिचा मोठा मुलगा

मॅडोनाचा तिरस्कार करतो तिचा मोठा मुलगा

डोनाची कारकीर्द जेवढी यशस्वी असल्याचे बोलले जाते तेवढीच वादग्रस्त असल्याचेही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यात तिचा कौटुंबिक कलह कधीही लपून राहिला नाही. आता तिच्या मुलाचीही या कलहात भर पडली असून, आईपासून वेगळा राहत असल्याचा आनंद होत असल्याचे त्याने नुकतेच स्पष्ट केले. 

मॅडोनाचा मुलगा रॉको रिची याने नुकतेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये आता मी आई आईसोबत राहत नसून, मी आंनदी असल्याचे म्हटले आहे. व्हिडीओमध्ये त्याचे संपुर्ण कुटूंब दिसत असून, त्यामध्ये ते मॅनेक्विन चॅलेंजमध्ये भाग घेत असल्याचे दिसत आहे. या चॅलेंजमध्ये स्पर्धकांना कुठल्याही प्रकारची हालचाल न करता आहेत त्या स्थितीत स्थिर रहावे लागते. व्हिडीओमध्ये मॅडोनाही दिसत असून, ती जेवत असतानाच्या स्थितीत उभी आहे. 

त्याचबरोबर रॉकोचे दत्तक घेतलेले भाऊ आणि बहिण डेविड (११) व मर्सी (१०) हे पण बघावयास मिळत आहेत. रॉकोने या व्हिडीओ कॅप्शनमध्ये लिहले की, मी खुपच आनंदी असून, चिंतामुक्त झालो आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार रॉकोने मॅडोनाकडे न जाण्याचा निर्धार केला आहे. तो तिच्याकडे जाण्यास अजिबात उत्सुक नसल्यानेच त्याने अशाप्रकारचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

द सनने दिलेल्या माहितीनुसार रॉको आता दिग्दर्शक वडिल रिची यांच्यासोबत राहत असून, सोशल साइटवर त्याच्या आईचे असलेल्या फॅन्सना त्याने ब्लॉक केले आहे. कारण रॉको जेव्हा इंस्टाग्रामवर एखादी पोस्ट शेअर करतो तेव्हा हे फॅन्स त्याला विचित्र प्रश्न विचारतात. त्यामुळेच त्याने त्यासर्व फॅन्सना ब्लॉक केले आहे. 

रॉकोला गेल्या आठवड्यात अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 

Web Title: Madonna hates her older son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.