मॅडोना करायची मायकल जॅक्सनला डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 21:42 IST2016-12-09T21:42:08+5:302016-12-09T21:42:08+5:30

पॉप संगीताचा बादशाह मायकल जॅक्सनने जरी या जगाचा निरोप घेतला असला तरी, त्याच्यासोबतच्या आठवणी आजही हॉलिवूड कलाकारांना सतावत आहेत. ...

Madonna did Michael Jackson date | मॅडोना करायची मायकल जॅक्सनला डेट

मॅडोना करायची मायकल जॅक्सनला डेट

प संगीताचा बादशाह मायकल जॅक्सनने जरी या जगाचा निरोप घेतला असला तरी, त्याच्यासोबतच्या आठवणी आजही हॉलिवूड कलाकारांना सतावत आहेत. पॉप गायिका मॅडोना ही त्यातीलच एक असून, तिने जॅक्सनसोबतच्या आठवणी सांगताना एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

तिच्या मते ती, पॉप संगीताचा बादशाह मायकल जॅक्सनला डेट करायची. डेलीमेल डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार जेम्स कॉर्डच्या ‘द लेट लेट शो’मध्ये मॅडोनाने ही कबुली दिली आहे. एवढेच काय तर तिने मायकल जॅक्सनला जोरदार ‘पप्पी-झप्पी’ (टंग इन माउथ किस) दिल्याचेही म्हटले आहे. 

मॅडोनाने सांगितले की, मायकलसोबत केलेल्या डेटिंगबाबत वाच्यता करण्याची मला अजूनपर्यंत संधी मिळाली नव्हती. तसेच मलाही कोणी याविषयी विचारले नसल्याने मी यावर चुप्पी साधली. जेव्हा मी त्यांच्याशी डेट करीत होते, तेव्हा ते थोडेशे लाजाळू स्वभावाचे असल्याचे मला जाणवले. मात्र मैत्रीसाठी तयार होते. त्यांच्यासोबतचे क्षण मला आजही आठवतात. मायकल एक प्रेमळ व्यक्ती होते, त्यांच्याशी मैत्री करणे कोणालाही आवडले असते. त्यांना मी डेट केल्याचे सांगण्यात मला काहीच वावगे वाटत नसल्याचेही ती म्हणाली. 

Web Title: Madonna did Michael Jackson date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.