...अखेर मायली, लियाम अडकणार विवाहबंधनात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 18:03 IST2017-01-01T18:03:28+5:302017-01-01T18:03:28+5:30
‘द लास्ट सॉँग’ (२०१०) या रोमॅन्टिक सिनेमात अभिनेता लियाम हैम्सवर्थ याच्यासोबत काम करणारी गायिका तथा अभिनेत्री मायली सायरस लवकरच ...

...अखेर मायली, लियाम अडकणार विवाहबंधनात!
‘ लास्ट सॉँग’ (२०१०) या रोमॅन्टिक सिनेमात अभिनेता लियाम हैम्सवर्थ याच्यासोबत काम करणारी गायिका तथा अभिनेत्री मायली सायरस लवकरच लियाम हैम्सवर्थ याच्याशी विवाह बंधनात अडकणार आहे. त्याचबरोबर लवकरच ही जोडी पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र काम करण्याची शक्यता आहे.
एसशोबिज डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, २०१२ मध्ये साखरपुड्याची घोषणा करण्याअगोदर दोघेही एकमेकांना डेट करीत होते. मात्र २०१३ मध्ये त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. पुन्हा नाट्यमयरीत्या दोघे २०१५ मध्ये एकत्र आले. मायली लियामसोबत एकत्र काम करण्यास उत्सुक दिसली. दोघांमध्ये पुन्हा प्रेम फुलल्याने लवकरच ते लग्नाच्या बंधनात अडकतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र नंतरच्या काळात पुन्हा दोघांमध्ये बिनसल्याच्या बातम्या समोर आल्या. तेव्हापासानू दोघेजण एकत्र दिसले नाहीत. आता पुन्हा हे दोघे एकत्र आल्याची माहिती समोर येत आहे.
२०१७ मध्ये मायली लियामसोबत एका चित्रपटात काम करू इच्छिते. हा चित्रपट रोमॅन्टिक आणि कॉमेडी असण्याची शक्यता असून, त्यामध्ये दोघांची भूमिका एकमेकांचा तिरस्कार करणारी आहे. आता हे दोघे पुन्हा एकत्र आल्याने साहजिकच त्यांच्या लग्नाविषयीचीही चर्चा रंगणार आहे. मात्र तत्पूर्वीच मायलीने लग्नाविषयीच्या चर्चेला विराम दिला आहे.
ती म्हणाली की, अगोदर चित्रपट पूर्ण करायचा त्यानंतरच विवाहाचा विचार करायचा. कारण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील मतभेत पूर्णत: दूर होऊ शकतात, या विचारानेच अगोदर चित्रपट पूर्ण करण्याचा मात्र प्रयत्न असेल. दरम्यान सध्या दोघांमधील प्रेमळ संबंध फुलले असल्याने मायली खूश असून, आता त्यांनी लग्नाचा पक्का विचार केला आहे. मात्र लग्नाची तारीख निश्चित नसल्याने त्यांच्या लग्नाविषयीचे गुपित अजून कायम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षाच्या अखेरीस ते विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.
![]()