किमला वाटतेय मरणाची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 22:45 IST2016-12-14T22:45:16+5:302016-12-14T22:45:16+5:30

‘अल्झायमर’ या आजाराने ग्रस्त असलेली अभिनेत्री किम काटरल सध्या प्रचंड तणावात आहे. तिला या गोष्टीची भीती वाटत आहे की, ...

Kimla seems to be afraid of death | किमला वाटतेय मरणाची भीती

किमला वाटतेय मरणाची भीती

ल्झायमर’ या आजाराने ग्रस्त असलेली अभिनेत्री किम काटरल सध्या प्रचंड तणावात आहे. तिला या गोष्टीची भीती वाटत आहे की, या आजारामुळे तिचा मृत्यू तर होणार नाही ना?

फिमेल फर्स्ट डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ६० वर्षीय किमने सांगितले की, चार वर्षांपूर्वी वडिलांच्या मृत्यूमुळे मी प्रचंड तणावात आहे. मला याची भीती सातत्याने सतावत असल्याने मला जगण्यासाठी अक्षरश: संघर्ष करावा लागत आहे. 

खरं तर वडिलांच्या मृत्यूनंतर मी स्वत:ला सावरण्याचा खूप प्रयत्न करीत आहे. चांगले आणि आनंदी जीवन जगता यावे यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मात्र ‘अल्झायमर’मुळे माझे मनोबल दिवसेंदिवस खचत आहे. याच आजाराने माझ्या वडिलांचा बळी घेतला. अनुवांशिकरीत्या हा आजार माझ्या शरीरात आहे. मात्र हा जीवनाचा एक भाग असून, या विचारापासून मी दूर जाण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. 

माझे एकच ध्येय असून, पुढील आयुष्य आनंदी आणि मौजमस्ती करून व्यतित करायचे, असेही किम काटरलने सांगितले. 

Web Title: Kimla seems to be afraid of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.