तिसऱ्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर किम कार्देशियनने अशी घालवली पहिली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 03:41 PM2021-02-25T15:41:35+5:302021-02-25T15:44:42+5:30

किम तिच्या व्यवसायिक आयुष्याइतकीच वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

Kim Kardashian Enjoys Night Out Days After Filing For Divorce From Kanye West | तिसऱ्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर किम कार्देशियनने अशी घालवली पहिली रात्र

तिसऱ्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर किम कार्देशियनने अशी घालवली पहिली रात्र

googlenewsNext
ठळक मुद्देकिम आता तिच्या तिसऱ्या नवऱ्याला घटस्फोट देणार आहे. किमचे तिसरे लग्न कान्ये वेस्टसोबत झाले होते. सात वर्षांच्या संसारानंतर त्यांनी आता वेगळे व्हायचे ठरवले आहे.

हॉलिवूड अभिनेत्री किम कार्देशियन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दररोज ती तिचे बोल्ड फोटोज इन्स्टावर शेअर करते आणि चर्चेचा विषय ठरते. बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड सिनेइंडस्ट्री प्रत्येक सेलिब्रेटीची स्टार व्हॅल्यू ठरते ती त्यांच्या फॅन फॉलोइंगने. तर चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सेलिब्रेटी काहीही करायला तयार होतात. मग ते हटके लूक करतात तर कधी फोटोशूट. हॉलिवूडची अभिनेत्री, मॉडल आणि अनेक टीव्ही सीरीजमध्ये दिसलेली किम कार्देशियन नेहमीच आपल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. तिला सोशल मीडियावर देखील चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. किम तिच्या लूकसोबत नेहमीच एक्सपेरिमेंट करताना दिसते.

किम तिच्या व्यवसायिक आयुष्याइतकीच वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. किम आता तिच्या तिसऱ्या नवऱ्याला घटस्फोट देणार आहे. किमचे तिसरे लग्न कान्ये वेस्टसोबत झाले होते. सात वर्षांच्या संसारानंतर त्यांनी आता वेगळे व्हायचे ठरवले आहे. मंगळवारी किमने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि त्यानंतर एक सिंगल वुमन बनत एका पार्टीचा आनंद घेतला. पुन्हा सिंगल वुमन बनल्यानंतरची तिची पहिली रात्र खूपच खास होती. ती तिच्या बहिणीसोबत पार्टीत एन्जॉय करताना दिसली. किमने या पार्टीत घातलेल्या सेक्सी ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या ड्रेसमध्ये ती बोल्ड अँड ब्युटीफूल दिसत होती. किम पुन्हा एकदा सिंगल झाली असल्याने ती प्रचंड आनंदी दिसून येत आहे.

किम आणि कान्ये यांना चार मुले असून या चार मुलांची जॉईंट कस्टडी किमने मागितली आहे. कान्यने 3 करोड सहा लाखाची अंगठी देऊन किमला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्या दोघांचे कपल खूपच क्यूट होते. पण त्यांच्यात सतत वाद होत असल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.

Web Title: Kim Kardashian Enjoys Night Out Days After Filing For Divorce From Kanye West

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.