किम कर्दाशियनने केली नाकावर सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 17:54 IST2017-01-01T17:54:43+5:302017-01-01T17:54:43+5:30

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियन हिला चर्चेत राहण्यासाठी काय करायचे हे चांगले ठाऊक आहे. त्यामुळेच कधी बोल्ड फोटो शेअर ...

Kim Kardashani has surgery on his nose | किम कर्दाशियनने केली नाकावर सर्जरी

किम कर्दाशियनने केली नाकावर सर्जरी

अ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियन हिला चर्चेत राहण्यासाठी काय करायचे हे चांगले ठाऊक आहे. त्यामुळेच कधी बोल्ड फोटो शेअर करून ती धूम उडवून देत असते, तर कधी आपल्या कौटुंबिक विषयामुळे ती चर्चेत असते. यावेळेस तिने चर्चेत राहण्यासाठी भलताच कारनामा केला आहे. पती रॅपर कान्ये वेस्ट याच्याशी बिनसल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असताना, त्याला फाटा देण्यासाठी तिने चक्क नाकावर कॉस्मेटिक सर्जरी करून माध्यमांचे लक्ष स्वत:कडे वळविले आहे. 

मिरर डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, किमने तिची बहीण ख्लो कर्दाशियन हिच्या स्नॅपचॅटवर एका व्हिडीओमध्ये तिने तिचे नवे लिप रिंग दाखविले होते. मात्र तिच्या फॅन्सला यापेक्षा व्हिडीओमध्ये दिसत असलेले तिचे नाक अधिक भावले अन् बघता बघता तिच्या नाकावर चर्चा सुरू झाली. पुढे काय मग याविषयी संबंधित डॉक्टरांना खुलासा करावाच लागला.



‘द ईशा क्लिनिक’चे डॉ. टीजे ईशो यांनी सांगितले की, सुरुवातीला किमचे नाक पसरलेले आणि मोठे दिसायचे, जे तिला तिच्या वांशिक बॅकग्राउंडला मिळते-जुळते होते. मात्र सर्जरीनंतर तिचे नाक अधिक आकर्षित दिसत आहे. छोटे, आकारात कमी आणि सरळ दिसत असल्याने तिचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसत आहे. 

किमच्या नाकावर ‘रायनोप्लास्टी सर्जरी’ करण्यात आली असून, यामुळे तिच्या सौंदर्यात चारचॉँद लागले आहे. ज्यांनी ही सर्जरी केली त्या डॉक्टरांकडूनदेखील समाधान व्यक्त केले जात आहे. 

Web Title: Kim Kardashani has surgery on his nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.