ख्लो कर्दाशियन पहिल्या पतीच्या टीव्ही शोमुळे संतापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 17:47 IST2017-01-01T17:47:17+5:302017-01-01T17:47:17+5:30

रिअ‍ॅलिटी टीव्हीस्टार ख्लो कर्दाशियन सध्या तिचा पहिला पती लमार ओडोम याच्या टीव्ही शोमुळे चांगलीच संतापलेली आहे. ख्लोचा पहिला पती ...

Khló Kardashian is upset because of the first husband's TV show | ख्लो कर्दाशियन पहिल्या पतीच्या टीव्ही शोमुळे संतापली

ख्लो कर्दाशियन पहिल्या पतीच्या टीव्ही शोमुळे संतापली

अ‍ॅलिटी टीव्हीस्टार ख्लो कर्दाशियन सध्या तिचा पहिला पती लमार ओडोम याच्या टीव्ही शोमुळे चांगलीच संतापलेली आहे. ख्लोचा पहिला पती लमार ओडोम याने नवा रिअ‍ॅलिटी टीव्ही शो सुरू केला आहे. मात्र त्याचा हा शो ख्लो कर्दाशियन हिच्या पचनी पडलेला दिसत नाही. 

हॉलिवूडलाइफ डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ओडोम अमली पदार्थ आणि मद्यपानाच्या अतिसेवनामुळे गेल्या काही वर्षांपासून आजारी होता. सततच्या आजारपणामुळे त्याच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या. ख्लोनेदेखील याच काळात त्याची साथ सोडली. आता तो याच विषयावर डॉक्युमेंटरी स्वरूपात एक शो प्रेक्षकांसमोर आणणार आहे. यासाठी तो एका कंपनीबरोबर करारबद्धदेखील झाला आहे. 

मात्र ख्लो या शोच्या विरोधात आहे. या शोची निर्मिती व्हावी अशी ख्लोची अजिबात इच्छा नाही. ‘ओके’ या साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार ख्लोला याची भीती वाटत आहे की, या शोमध्ये तिच्याविषयी काही चुकीची माहिती दाखविली जाऊ नये. तसेच तिच्या परिवारालादेखील या शोमधून बदनाम केले जाण्याची तिला भीती वाटत आहे. 

या शोची निर्मिती होऊ नये, यासाठी तिने वकिलांशी चर्चा केल्याचे समजते. मात्र ओडोम या शोच्या निर्मितीवर ठाम आहे. त्याचबरोबर या शोमधून त्याच्याविषयी लोकांचे काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी तो उत्सुक आहे. 



ख्लो कर्दाशियन पहिला पती लमार ओडोम​सोबत

Web Title: Khló Kardashian is upset because of the first husband's TV show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.