जस्टिन थेरॉक्स जेनिफर एनस्टिनसोबतचा सेल्फी केला शेअर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 15:03 IST2017-04-18T09:32:30+5:302017-04-18T15:03:27+5:30

​हॉलिवूड स्टार कपल जेनिफर एनस्टिन आणि जस्टिन थेरॉक्स सध्या पॅरिसमध्ये एकमेकांसोबत सुंदर क्षण एन्जॉय करीत आहेत.

Justin Theroux shares selfie with Jennifer Northen | जस्टिन थेरॉक्स जेनिफर एनस्टिनसोबतचा सेल्फी केला शेअर!

जस्टिन थेरॉक्स जेनिफर एनस्टिनसोबतचा सेल्फी केला शेअर!

लिवूड स्टार कपल जेनिफर एनस्टिन आणि जस्टिन थेरॉक्स सध्या पॅरिसमध्ये एकमेकांसोबत सुंदर क्षण एन्जॉय करीत आहेत. थेरॉक्स जेनिफर एनस्टिनसोबतचा एक सुंदर सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर याबाबतचा उलगडा झाला आहे. 

सेल्फीत दोघेही खूश दिसत असून, हा सेल्फी एका फॅशन कार्यक्रमात काढला होता. या कार्यक्रमात हे जोडपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. थेरॉक्स हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करीत त्याच्या फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘इन लुव्रे’ जेनिफर आणि थेरॉक्स यांनी तब्बल तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१५ मध्ये ते लग्नाच्या बंधनात अडकले. 

काही दिवसांपूर्वीच थेरॉक्सने म्हटले होते की, जर जेनिफरसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास त्याला आनंदच होईल. आतापर्यंत या दोघांनी एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. त्यामुळे हे दोघे एकत्र आल्यास त्यांच्या चाहत्यांना त्याचा आनंदच होईल. दरम्यान, सध्या हे कपल पॅरिसमध्ये असून, त्याठिकाणी सुट्या एन्जॉय करीत आहे. 

जेनिफर सध्या तिच्या करिअरमध्ये आघाडीवर आहे. हॉलिवूडमध्ये सध्या तिची डिमांड असून, एकापाठोपाठ एकत्र चित्रपटांची आॅफर तिच्याकडे आहे. दरम्यान, सध्या पती थेरॉक्ससोबत सुट्या एन्जॉय करीत असून, ती खूश असल्याचे दिसत आहे. पती थेरॉक्सने शेअर केलेल्या या सेल्फीला त्यांच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. 

">http://

Web Title: Justin Theroux shares selfie with Jennifer Northen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.