मुंबईतील कॉन्सर्टनंतर जस्टिन बीबर झाला गायब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 17:25 IST2017-05-11T11:55:47+5:302017-05-11T17:25:47+5:30

इंटरनॅशनल पॉप सिंगर जस्टिन बीबर याच्या काल मुंबई येथे झालेल्या लाइव्ह कॉन्सर्टने संपूर्ण मुंबई जस्टिनमय झाली होती. तब्बल ५० ...

Justin Bieber has disappeared after the concert in Mumbai! | मुंबईतील कॉन्सर्टनंतर जस्टिन बीबर झाला गायब!

मुंबईतील कॉन्सर्टनंतर जस्टिन बीबर झाला गायब!

टरनॅशनल पॉप सिंगर जस्टिन बीबर याच्या काल मुंबई येथे झालेल्या लाइव्ह कॉन्सर्टने संपूर्ण मुंबई जस्टिनमय झाली होती. तब्बल ५० हजार बिलिबर्स जस्टिनच्या रंगात रंगले होते. बॉलिवूडकरही बीबरचे अक्षरश: दिवाने झाल्याचे बघावयास मिळाले. मात्र परफॉर्मन्सनंतर जस्टिन रातोरात गायब झाल्याने, तो नेमका कुठे गेला असावा, याचा आता शोध घेतला जात आहे. 



काल रात्री ८.१५ वाजता जस्टिन स्टेजवर आला होता. त्याची एंट्री अशी काही धमाकेदार होती की, तब्बल ५० फॅन्स त्याच्या एंट्रीनेच बेशुद्ध झाले होते. रात्री दहापर्यंत स्टेजवर जस्टिनने असा काही परफॉर्मन्स केला की, सगळेच त्याच्याबरोबर नाचायला लागले. एकापेक्षा एक सरस गाणी गात जस्टिनने मुंबईमध्ये धूम उडवून दिली. रात्री १० वाजेपर्यंत जस्टिनने स्टेज गाजविले. त्यानंतर मात्र त्याचा शोध घेणे सगळ्यांनाच अवघड झाले. कारण कॉन्सर्टनंतर जस्टिन कुठे गायब झाला हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न होता. त्यामुळे अजूनही कन्फर्म झाले नाही की, जस्टिनने मुंबई सोडली की नाही?
 
अशात असेही बोलले जात आहे की, जर जस्टिन मुंबई बाहेर गेला असेल तर त्याचा एकतरी फोटो माध्यमांमध्ये आला असता. परंतु कॉन्सर्टनंतर त्याची झलक दिसेल असा एकही फोटो अद्यापपर्यंत समोर आलेला नाही. जस्टिनच्या शेड्यूल्डनुसार तो कॉन्सर्टच्या दुसºया दिवशी आग्रा येथील ताजमहालला भेट देणार होता. त्याचबरोबर राजस्थानमधील पिंक सिटीला भेट देण्याचाही त्याचा मानस होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो काही बॉलिवूड सेलिब्रिटींनाही भेटणार होता. मात्र तो आज दिवसभरात कुठेच दिसला नसल्याने अनेकांना जस्टिन कुठे गेला असावा, असा प्रश्न पडला आहे. 



वृत्तानुसार जस्टिन त्याच्या भारत दौºयातील दुसºया दिवशीचे सर्व कार्यक्रम रद्द करून मायदेशी परतला आहे. २३ वर्षीय जस्टिन त्याच्या पर्पज टूरसाठी भारतात आला होता. मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडिअमवर आयोजित केलेल्या या कॉन्सर्टमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर ५० हजारांपेक्षा अधिक फॅन्स त्या ठिकाणी पोहोचले होते. कॉन्सर्टसाठी चार हजारापासून ते २५ हजारापर्यंतचे तिकीट आकारले होते. 

Web Title: Justin Bieber has disappeared after the concert in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.