JUSTIN BIEBER CONCERT: दीपिका पदुकोन आणि आलिया भट्ट करणार जस्टीन बीबरसोबत परफॉर्म?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 18:15 IST2017-02-23T12:44:23+5:302017-02-23T18:15:30+5:30
पॉप सिंगर जस्टीन बीबर भारतात येणार या बातमीनेच आनंदून गेलेल्या कॉन्सर्टप्रेमींसाठी आमच्याकडे एक सुखद वार्ता आहे. जस्टीनच्या कॉन्सर्टसाठी अद्याप ...

JUSTIN BIEBER CONCERT: दीपिका पदुकोन आणि आलिया भट्ट करणार जस्टीन बीबरसोबत परफॉर्म?
प प सिंगर जस्टीन बीबर भारतात येणार या बातमीनेच आनंदून गेलेल्या कॉन्सर्टप्रेमींसाठी आमच्याकडे एक सुखद वार्ता आहे. जस्टीनच्या कॉन्सर्टसाठी अद्याप तीन महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी त्याच्यासोबत बॉलीवूडमधील कोण कोण स्टार्स परफॉर्म करणार याची चर्चा सुरू झाली आहे.
त्यामध्ये सर्वात पहिले नाव आले आहे ते दीपिका पदुकोनचे. मुंबईत डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करण्यासाठी आयोजक दीपिकाशी बोलणी करीत असून लवकरच याविषयी अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिकासह बॉलीवूडमधील अनेक दिग्गज स्टार्स या कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यास उत्सुकत आहेत. परंतु अद्याप कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.
दीपिका नुकतीच हॉलीवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ झँडर केज’मध्ये झळकली होती. त्यामुळे तिच्या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेमुळे तिची वर्णी लागण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जातेय.
►ALSO READ: .जस्टीन बीबरच्या कॉन्सर्टच्या तिकिटाची किंमत ऐकाल तर हैराण व्हाल!
त्याबरोबरच ‘स्टुडंट आॅफ द इयर’ चित्रपटातील आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासोबतदेखील बोलणी सुरू आहे. आता या सर्व चर्चा कितपत खऱ्या ठरतात हे तर येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
गेल्या वर्षी ब्रिटिश रॉकबँड ‘कोल्डप्ले’च्या कॉन्सर्टमध्ये मुंबईत झालेल्या सुपरस्टार शाहरुख व ए. आर. रहमानसह अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यामुळे जस्टीनच्या पहिल्या वहिल्या भारतीय कॉन्सर्टमध्येही स्टार्सचा भरणा असेल अशी शक्यता आहे.
जस्टीनचा मुंबई कॉन्सर्ट हा त्याच्या ‘परपझ वर्ल्ड टूर’चा भाग आहे. त्यामध्ये तो ‘व्हेअर आर ऐस नाऊ, ‘बॉयफ्रेंड’, ‘लव्ह युवरसेल्फ’, ‘कंपनी’, ‘अॅजा लाँग अॅज यू लव्ह मी’, ‘व्हॉट डू यू मीन’, ‘बेबी’ आणि ‘परपझ’ अशी लोकप्रिय गाणी लाईव्ह सादर करणार आहे. आतापर्यंत य टूरमध्ये त्याने अमेरिका, कॅनडा, जपान येथे कार्यक्रम केलेले असून भारतासह तो दुबई आणि तेल अवीव येथेही कॉन्सर्ट करणार आहे.
►ALSO READ: स्टिन बीबर येणार भारतात! कधी व कुठे करणार परफॉर्म, वाचा सविस्तर