जस्टिन बीबरचे हे पाच कॉन्ट्रोव्हर्शियल किस्से वाचाल तर तुम्हाला धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 21:18 IST2017-05-09T15:48:44+5:302017-05-09T21:18:44+5:30

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार जस्टिन बीबर उद्या (दि.१०) मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियम येथे येत असून, याठिकाणी त्याची लाइव्ह ...

Justin Biber's five controversial tales, you will be shocked! | जस्टिन बीबरचे हे पाच कॉन्ट्रोव्हर्शियल किस्से वाचाल तर तुम्हाला धक्का बसेल!

जस्टिन बीबरचे हे पाच कॉन्ट्रोव्हर्शियल किस्से वाचाल तर तुम्हाला धक्का बसेल!

तरराष्ट्रीय पॉप स्टार जस्टिन बीबर उद्या (दि.१०) मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियम येथे येत असून, याठिकाणी त्याची लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे. जस्टिनच्या या कॉन्सर्टसाठी देशभरातील प्रेक्षक मुंबईत पोहोचत असून, बॉलिवूडचे अनेक दिग्गजही या कॉन्सर्टला उपस्थित राहणार आहेत. दिग्दर्शक करण जोहर तर जस्टिनला ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये आणण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. असो, पण तुम्हाला हे माहिती आहे काय की, जस्टिन बीबर त्याच्या गाण्यांपेक्षा इतर गोष्टींमुळेच अधिक वादात असतो. होय, जस्टिन बीबर आणि कॉन्ट्रोव्हर्सी यांचे जणू काही नातच आहे. कारण बीबर नेहमीच असा काही वाद निर्माण करतो, ज्यामुळे तो माध्यमांमध्ये नेहमीच चर्चिला जातो. असेच त्याचे काही कॉन्ट्रोव्हर्शियल किस्से आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे वाचून तुम्ही अवाक् व्हाल...



असे म्हटले जाते की, जस्टिन बीबर खूपच उद्धट गायक आहे. खरं तर हे त्याने त्याच्या स्वभावातून दाखवून दिले आहे. सोशल मीडियावर जेव्हा त्याने त्याला न्यूड फोटो अपलोड केला होता तेव्हा एकच कल्लोळ झाला होता. हातात गिटार घेऊन जस्टिनचा हा न्यूड फोटो बघून त्याच्या फॅन्सला धक्का बसला होता. या फोटोमध्ये त्याची आजीही बघावयास मिळत आहे. 



जस्टिन बीबरला कॉन्ट्रोव्हर्सी किंग असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. त्याच्यातील उद्धटपणा परिसीमा तेव्हा ओलांडली गेली जेव्हा तो त्याचा मित्र शॅरिफ एक मुलीसोबत आपत्तीजनक स्थितीत बघावयास मिळाला होता. त्याचे हे फोटो त्यावेळी प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. त्याकाळी बीबर सर्वत्र टीकेचा धनीही ठरला होता. 



नशेत वाद घालण्यात बीबरचा कोणीच हात पकडू शकत नाही. कारण तो ज्या पबमध्ये मद्यपान करण्यासाठी जातो त्याठिकाणी हमखासपणे वाद निर्माण होतो. बºयाचशा ठिकाणी त्याने नशेच्या भरात पबमधील कर्मचाºयांना मारहाण केली आहे. 



जस्टिन त्याच्या गर्लफ्रेण्डवरूनही नेहमीच वादात असतो. कारण त्याच्या गर्लफ्रेण्डची संख्या प्रचंड असून, आतापर्यंत कित्येक मॉडेलशी त्याचे नाव जोडले गेले आहे. जेव्हा त्याला गर्लफ्रेण्ड रिचीसोबत पब्लिक प्लेसमध्ये सेक्स करताना बघण्यात आले, तेव्हा सगळ्यांचीच बोलती बंद झाली होती. 

Web Title: Justin Biber's five controversial tales, you will be shocked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.