या सेलिब्रेटीचा बॉडीगार्ड करणार जस्टिन बीबरचे संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2017 10:52 IST2017-05-06T05:17:05+5:302017-05-06T10:52:26+5:30
पॉप सिंगर ख्रिस मार्टीन पाठोपाठ भारतीय संगीत प्रेमींना आता प्रसिध्द पॉप सिंगर जस्टिन बीबरच्या तालावर थिरकण्याची संधी मिळणार आहे. ...

या सेलिब्रेटीचा बॉडीगार्ड करणार जस्टिन बीबरचे संरक्षण
प प सिंगर ख्रिस मार्टीन पाठोपाठ भारतीय संगीत प्रेमींना आता प्रसिध्द पॉप सिंगर जस्टिन बीबरच्या तालावर थिरकण्याची संधी मिळणार आहे. जस्टिन बीबरचा बहुप्रतिक्षित भारत दौरा येत्या 7मेपासून सुरू होतोय.एका परपझ टुरसाठी जस्टिन बीबर भारतात येतोय.भारतात आल्यानंतर जस्टिन बीबरचे कॉन्सर्ट होणार नाही हे शक्यच नाही. त्यानुसार येत्या 10 मेला नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये त्याचा कॉन्सर्ट होणार आहे.या कॉन्सर्टला होणारी गर्दी आणि जस्टिन बीबरच्या चाहत्यांची संख्या पाहता त्याच्या सुरक्षेवरही खास लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणेसोबतच दबंग सलमान खानचा पर्सनल बॉडीगार्ड शेरा जस्टिन बीबरच्या सुरक्षेची खास व्यवस्था पाहणार आहे. शेराची टायगर सिक्युरिटी हे काम करणार आहे. अशाप्रकारे एखाद्या हॉलिवूड सेलिब्रिटीच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्याची शेराची ही पहिलीच वेळ नसून त्याने याआधीही कित्येक हॉलिवूड सेलिब्रेटींच्या सुरक्षेची जबाबादारी पार पाडली आहे.त्याने यापूर्वी विल स्मिथ, जॅकी चॅन या हॉलिवूड सेलिब्रिटींची सुरक्षेची जबाबदारी पार पाडली होती.त्यामुळे जस्टिन बीबरला सुरक्षा पुरवणे हे काही शेरासाठी नवीन नाहीय.जस्टिन बीबरसाठी सुरेक्षचा विचार करता एक नव्हे तर दोन फाइव्ह स्टार हॉटेल बुक केले जाणार आहेत.हॉटेलमध्ये जवळपास १३ रूम्स बुक केल्या जाणार आहेत. त्यामुळे येत्या 10 मेला जस्टिन बीबरसोबतच सलमानचा बॉडीगार्ड शेराचा भावही चांगलाच वधारलेला पाहायला मिळणार आहे.
Also Read:मुंबईत येणाऱ्या जस्टिन बीबरची डिमांड लिस्ट झाली व्हायरल
Also Read:मुंबईत येणाऱ्या जस्टिन बीबरची डिमांड लिस्ट झाली व्हायरल