हॅरी पॉटर स्टार करणार जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टला होस्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 21:55 IST2017-04-21T16:25:03+5:302017-04-21T21:55:03+5:30

प्रसिद्ध पॉप स्टार जस्टिन बीबर हा पुढच्या महिन्यात मुंबई येथे येणार असून, डी. वाय. पाटील मैदानावर त्याची लाइव्ह कॉन्सर्ट ...

Justin Biber's concert host to Harry Potter Star | हॅरी पॉटर स्टार करणार जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टला होस्ट!!

हॅरी पॉटर स्टार करणार जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टला होस्ट!!

रसिद्ध पॉप स्टार जस्टिन बीबर हा पुढच्या महिन्यात मुंबई येथे येणार असून, डी. वाय. पाटील मैदानावर त्याची लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे. जेव्हापासून जस्टिन भारतात येणार असल्याचे स्पष्ट झाले तेव्हापासून त्याच्या या कॉन्सर्टमध्ये कोणकोणते कलाकार भाग घेतील, याविषयी चर्चा रंगली आहे. आता आलेल्या माहितीनुसार या कॉन्सर्टमध्ये आणखी एक इंटरनॅशनल कलाकार सहभागी होणार असल्याने प्रेक्षकांना ही कॉन्सर्ट पर्वणी ठरण्याची शक्यता आहे. 

होय, ‘हॅरी पॉटर’, ‘द हाफ ब्लड प्रिंस’, ‘१३ स्टेप्स डाउन’, ‘माय ब्रदर द डेविल’ मध्ये बघावयास मिळालेली ब्रिटिश अभिनेत्री इलेरिका जॉनसन या कॉन्सर्टला होस्ट करणार आहे. इलेरिका या टूरविषयी खूपच एक्साइटेड असून, तिचे भारतीय फॅन्सदेखील ती येणार असल्याच्या बातमीने सुखावले आहेत. 



हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना इलेरिकाने सांगितले की, मी सुरुवातीपासूनच भारतात येण्यास उत्सुक होती. मी लहानपणापासूनच बॉलिवूड चित्रपट बघत आली आहे. आता मी एक अभिनेत्री असल्याने मला भारतात येण्याची संधी मिळाली आहे. मी मुंबईला येण्यास खूप उत्सुक असल्याचे तिने सांगितले. तसेच भारतीय संस्कृती जाणून घेण्याची मला संधी मिळणार असून, लहानपणापासूनचे स्वप्न साकार होणार असल्याचेही तिने म्हटले आहे. 

सध्या मुंबईमध्ये जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टची जोरदार तयारी सुरू असून, तिकीट विक्रीला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या १० मे रोजी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी होणार आहेत. 

Web Title: Justin Biber's concert host to Harry Potter Star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.