जस्टीन बीबरने घेतले ८८ लाख प्रतिमहिन्याचे ‘पार्टी हाऊस’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 13:17 IST2016-10-19T13:17:27+5:302016-10-19T13:17:27+5:30
पॉप स्टार जस्टीन बीबर त्याच्या धुंद पार्टी करण्याच्या स्वभावासाठी ओळखला जातो. अय्याशी, मौजमजा म्हणजे त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग. म्हणून ...

जस्टीन बीबरने घेतले ८८ लाख प्रतिमहिन्याचे ‘पार्टी हाऊस’
प प स्टार जस्टीन बीबर त्याच्या धुंद पार्टी करण्याच्या स्वभावासाठी ओळखला जातो. अय्याशी, मौजमजा म्हणजे त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग. म्हणून तर त्याने दिलखुलास पार्टी करण्यासाठी लंडनमध्ये एक आलिशान घर किरायाने घेतले आहे.
ब्रिटिश राजधानीच्या नॉर्थ लंडन स्ट्रीटवर स्थित या घराचा किराया ऐकला तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. दरमाह १.०८ लाख पाऊंड (८८.६१ लाख रुपये) एवढ्या जास्त किराया या २४ हजार चौ. फुट घराचा आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी हे घर बांधण्यात आले होते. आतापर्यंत अनेकदा रिनोव्हेशन करण्यात आले आहे.
![Justin Bieber Party Mansion]()
![Justin Bieber rents a party mansion1]()
नॉर्थ लंडन स्ट्रीट म्हणजे विदेशी डिप्लोमॅट्स आणि राजेशाही घराण्यातील लोकांची वसाहत आहे. जगभरातील अतिश्रीमंत लोकांची घरे येथे आहेत. लंडनमधील सर्वात महागड्या भागात जस्टीनने घर घेतले आहे. जगभरातील श्रीमंतांना या भागात घर घेण्याची ओढ असते.
जस्टीनच्या या घरातील बाथरुममध्ये १२ प्रकारचे इटालियन मार्बल्सचा वापर करण्यात आला आहे. त्याबरोबरच एक आऊटडोअर पूल, स्पा, टेनिस कोर्ट आणि वाईन सेलरदेखील या घरामध्ये आहे.
![]()
![Justin Bieber rents a party mansion2]()
जवळच्या सुत्रांनी सांगितले की, ‘सर्व आधूनिक सुखसुविधा या आलिशान ‘पार्टी हाऊस’मध्ये आहेत. परंतु हे घर घेण्यामागे सर्वात प्रमुख कारण म्हणजे त्याला मिळणारी प्रायव्हसी आहे. त्याच्यासारख्या अति लोकप्रिय कलाकाराला मीडिया आणि लोकांच्या नजरेपासून दूर मनमोकळेपणाने राहता येण्यासाठी हे घर आदर्श आहे.’
म्हणजे आता येथून पुढे जस्टीन आणि त्याच्या ‘पार्टी क्रेझी’ मित्रांच्या ‘वाईल्ड पार्टीज्’ या घरात केल्या जाणर आहेत. विशेष म्हणजे जस्टीनचे हे काही पहिले पार्टी हाऊस नाही. यापूर्वीदेखील त्याने विविध शहरांत असे आलिशान घरं किरायावर घेतलेले आहेत.