जेसिका बिल म्हणतेय, माझ्या पतीत दोष नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 20:15 IST2017-01-12T20:15:17+5:302017-01-12T20:15:17+5:30

अभिनेत्री जेसिका बिल सध्या पती जस्टिन टिम्बरलेकचे गोडवे गात आहे. माझ्या पतीसारखा दुसरा कोणी नाहीच, अशा शब्दांमध्ये ती त्याच्यावर ...

Jessica Bill says, I do not blame myself | जेसिका बिल म्हणतेय, माझ्या पतीत दोष नाही

जेसिका बिल म्हणतेय, माझ्या पतीत दोष नाही

िनेत्री जेसिका बिल सध्या पती जस्टिन टिम्बरलेकचे गोडवे गात आहे. माझ्या पतीसारखा दुसरा कोणी नाहीच, अशा शब्दांमध्ये ती त्याच्यावर स्तुतिसुमने उधळत आहे. कारण तिच्या मते, विवाहाच्या चार वर्षांनंतरही मला माझ्या पतीत कुठल्याच प्रकारचा दोष दिसून आला नाही. 

आॅक्टोबर २०१२ मध्ये जेसिका बिल आणि जस्टिन टिम्बरलेक यांचा विवाह झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ३४ वर्षीय स्टार जेसिका बिल द एलेन शोमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने जस्टिनवर अशी काही स्तुतिसुमने उधळली की, बघणारेही थक्क झाले. माझे वैवाहिक जीवन अतिशय आनंदात जात असून, मी माझा पती जस्टिनवर खूश आहे. मला आतापर्यंत त्याच्यात कुठलाच दोष दिसला नाही. 



जेसिका बिल पती जस्टिन टिम्बरलेकसोबत
पुढे बोलताना जेसिका म्हणाली की, सध्या ज्या पद्धतीने आमचे वैवाहिक जीवन सुरू आहे, त्यावरून आम्ही जन्मोजन्मीचे पती-पत्नी आहोत, असेच मला वाटते. जस्टिन हा एक जबाबदार पती असून, आतापर्यंत त्याने सर्व जबाबदाºया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. मी त्याची पत्नी असल्याचा अभिमान वाटत असल्याचेही जेसिकाने सांगितले. 

काही महिन्यांपूर्वी जेसिका आणि जस्टिन टिम्बरलेक यांच्यात बिनसल्याची चर्चा पुढे आली होती. त्याचबरोबर दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचेही बोलले जात होते. अशात जेसिकाने जस्टिनविषयीचे गायलेले गोडवे आश्चर्यचकित करणारे असून, या दोघांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचेच तिच्या वक्तव्यावरून दिसत आहे. शिवाय ख्रिसमसमध्ये दोघांनी जबरदस्त धमाल केल्यानेही त्यांच्याविषयीच्या या चर्चा निव्वळ अफवा असल्याचेही स्पष्ट झाले आहे. काहीही असो या दोघांच्या फॅन्सना हे जोडपे एकत्र राहावे, असेच वाटत असेल, हे नक्की. 

Web Title: Jessica Bill says, I do not blame myself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.