डॅरेनवर जडले जेनिफरचे प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 22:10 IST2016-12-04T22:10:45+5:302016-12-04T22:10:45+5:30

आॅस्कर विजेती अभिनेत्री जेनिफर लॉरेंसने दिग्दर्शक डॅरेन एरोनोफ्स्की यांच्याकडे तिच्या घराच्या चाव्या सुपूर्द केल्या आहेत. त्यामुळे आता डॅरेनला लॉस ...

Jennifer's love for Darren | डॅरेनवर जडले जेनिफरचे प्रेम

डॅरेनवर जडले जेनिफरचे प्रेम

स्कर विजेती अभिनेत्री जेनिफर लॉरेंसने दिग्दर्शक डॅरेन एरोनोफ्स्की यांच्याकडे तिच्या घराच्या चाव्या सुपूर्द केल्या आहेत. त्यामुळे आता डॅरेनला लॉस एन्जेलिस येथे कधीही जेनिफरच्या घरी जाता येणार आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जेनिफर डॅरेनवर फिदा आहे. ती त्याला जीवनसाथी बनविण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळेच तिने त्याला घरी येण्याचे निमंत्रण दिले आहे. मात्र या नात्याला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसल्याने जेनिफरने डॅरेनला दिलेले निमंत्रण वादाच्या भोवºयात सापडण्याची शक्यता आहे. 



जेनिफर लॉरेंस
फिमेलफर्स्ट डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, दोघांचाही संबंधांमधील ही सुरुवात आहे. मात्र जेनिफर यास मान्य करण्यास तयार नसून, ती डॅरेनला पहिल्या प्रेमसंबंधांपेक्षाही जवळची मानत आहे. 

क्रिस मार्टिन याच्याबरोबर २०१५ मध्ये काही काळ रोमांस केल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. ‘ग्रॅजिया’ या साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या दिवसांमध्ये जेनिफर डॅरेनला डेट करण्यास उत्सुक नव्हती. मात्र काही काळानंतर ती त्याच्या प्रेमात पडली. 

जेनिफरने स्पष्ट केले की, तिच्या जीवनातला राजकुमार हा डॅरेनच असून, ज्याची तिला प्रतीक्षा होती. त्यामुळे ती सध्या या नात्यात गंभीर झाली आहे. त्यांच्या या नात्याची माहिती जेनिफरने तिच्या मित्रांशी शेअर केली आहे. तसेच ती लवकरच डॅरेनसोबत संसारात रमण्यास उत्सुक आहे. आतापर्यंत जेनिफरने ज्या ज्या स्टार्सला डेट केले आहे, त्यात डॅरेन हा सगळ्यात प्रभावी व्यक्ती असल्याचे ती सांगते. 



डॅरेन एरोनोफ्स्की

Web Title: Jennifer's love for Darren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.