​जेनेफर लॉरेन्सने केले बॉयफ्रेंडला रस्त्यावर किस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 14:32 IST2016-11-05T14:32:09+5:302016-11-05T14:32:09+5:30

आघाडीची अभिनेत्री जेनेफर लॉरेन्स आणि तिचा कथित बॉयफ्रेंड डॅरेन अ‍ॅरोनॉफस्की यांना न्यूयॉर्कमध्ये भर रस्त्यावर किस करताना पाहिले गेले. त्यांचा ...

Jennifer Lawrence made Kiss Boyfriend on the road | ​जेनेफर लॉरेन्सने केले बॉयफ्रेंडला रस्त्यावर किस

​जेनेफर लॉरेन्सने केले बॉयफ्रेंडला रस्त्यावर किस

ाडीची अभिनेत्री जेनेफर लॉरेन्स आणि तिचा कथित बॉयफ्रेंड डॅरेन अ‍ॅरोनॉफस्की यांना न्यूयॉर्कमध्ये भर रस्त्यावर किस करताना पाहिले गेले. त्यांचा हा ‘पीडीए’ फोटो सध्या इंटरनेटवर चांगलाच गाजतोय. त्यामुळे दोघांच्या नात्यावर आता शिक्कामोर्तब झाले असेच म्हणावे लागेल.

गेली अनेक महिने दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे. परंतु जेनेफर किंवा डॅरेन यांपैकी कोणीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. डॅरेन दिग्दर्शित करीत असलेल्या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि ते प्रेमात पडले, असे सांगितले जातेय. सुत्रांनुसार दोघे एकमेकांच्या प्रेमांत आकांत बुडालेले असून त्यांच्या नात्याला ते मीडियापासून दूर ठेवू इच्छितात.

मध्यंतरी जेव्हा डॅरेनच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले तेव्हा जेनेफर अनेक वेळा त्यांना भेटण्यासाठी दवाखान्यात गेली होती. आपल्या भूमिकेला नीट समजून घेण्यासाठी ती डॅरेनच्या कायम संपर्कात असते. त्यामुळे ‘हंगर गेम्स’ स्टार जे.लॉ आणि ‘ब्लॅक स्वॉन’ दिग्दर्शक डॅरेन हॉलीवूडचे ‘न्यू कपल’ बनले आहेत.

                                  

यापूर्वी जेनेफर ‘कोल्डप्ले’ बँडचा सदस्य क्रिस मार्टिनला डेट करीत होती. परंतु दोघांच्याही अतिलोकप्रियतेमुळे त्यांचे खासगी जीवन नेहमीच मीडिया गॉसिपच्या केंद्रस्थानी राहत असते. याचा परिणाम दोघांच्या नात्यावर झाला. डॅरेनसोबत मात्र समीकरणच वेगळे आहे. त्याला सतत प्रकाश झोतात राहायला आवडत नाही. म्हणून तर जेनेफर पहिल्यापेक्षा खूप खुश आहे.

तिकडे डॅरेननेसुद्धा पहिल्या पत्नीपासून फारकत घेतलेली आहे. या तणावाच्या काळात जेनेफरने त्याला खूप सपोर्ट दिला. त्याच्या मित्रांच्या मते, तो खूप लाजाळू आहे. मुलींच्या बाबतीत तर तो खूप मागे आहे. त्याला रिलॅक्स होण्यासाठी जेनेफरने न्यूयॉर्कमध्ये एक अपार्टमेंटदेखील घेतले. सध्या तो तेथेच राहतो.

Web Title: Jennifer Lawrence made Kiss Boyfriend on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.