​जेनिफर अ‍ॅनिस्टनच्या नवऱ्याची ब्रॅड पिटवर आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 16:52 IST2016-11-01T16:52:42+5:302016-11-01T16:52:42+5:30

‘फ्रेंडस्’स्टार  जेनिफर अ‍ॅनिस्टन आणि ब्रॅड पिट हे जोडपे एकेकाळी हॉलीवूडचे सर्वाेत्तम कपल म्हणून ओळखले जायचे. परंतु अँजेलिना जोलीशी ‘मि. ...

Jennifer Aniston's husband Brad Pitt | ​जेनिफर अ‍ॅनिस्टनच्या नवऱ्याची ब्रॅड पिटवर आगपाखड

​जेनिफर अ‍ॅनिस्टनच्या नवऱ्याची ब्रॅड पिटवर आगपाखड

्रेंडस्’स्टार  जेनिफर अ‍ॅनिस्टन आणि ब्रॅड पिट हे जोडपे एकेकाळी हॉलीवूडचे सर्वाेत्तम कपल म्हणून ओळखले जायचे. परंतु अँजेलिना जोलीशी ‘मि. अँड मिसेस स्मिथ’च्या सेटवर भेट झाल्यानंतर ब्रॅडने जेनिफरशी फारकत घेऊन अँजिसोबत घर बसवले.

ब्रॅडने केलेला विश्वासघात जेनिफर अजुनही विसरलेली नाही. म्हणून तर​ ब्रँजेलिनाच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर तिने ‘हे तर शेवटी होणारंच होतं’ अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती. आता तिचा पती जस्टीन थेरॉक्सनेसुद्धा ब्रॅडविषयी असणारा राग एका वेगळ्या प्रकारे व्यक्त केला.

जस्टीनने सोशल मीडियावर निक फ्लॅट नावाच्या एका ग्राफिटी आर्टिस्टची डिझाईन शेअर केली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकांविषयी त्याला वाटणारी चीड त्याने या ग्राफिटी डिझाईनच्या माध्यमातून मांडली. 

                                Grafiiti

यामध्ये एक मुलगी उजव्या हाताचे मधले बोट दातांमध्ये चावताना दिसते आणि तिच्या मागे अत्यंत अर्वाच्य शब्दांत राजकारण, युद्ध, भांडवलशाहीला शिव्या लिहिलेल्या आहेत. पण या शिव्यांमधील एका शिवीने नेटिझन्समध्ये अक्षरश: वादळ पेटले. 

कारण त्या मुलीच्या चेहऱ्याच्या बाजूला ब्रॅड पिटला शिवी दिलेली आहे. जस्टीनच्या फॉलोवर्सना ही गोष्ट लक्षात आल्यावर वाऱ्यासारखा हा फोटो व्हायरल झाला. अनेकांनी तर बायकोच्या पूर्व पतीला शिव्या दिल्या म्हणून त्याचे अभिनंदनसुद्धा केले.

                                Jeni Aniston Chelsi
                                जेनिफर अ‍ॅनिस्टन आणि चेल्सी हँडलर

तत्पूर्वी जेनिफर आणि जस्टीनची मैत्रिण चेल्सी हँडलरने ​ब्रँजेलिनाच्या घटस्फोटानंतर जेनिफर बाजू घेतली आणि तिच्यावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले की, ‘जेनिफर तिच्या संसारात फार सुखी आहे. अँजेलिना-ब्रॅडचे लग्न तुटले की नाही याच्याशी तिला काहीही घेणे-देणे नाही. उलट अँजेलिनाच मुर्ख आहे की तिने ब्रॅडशी लग्न केले. जेनिफरला यापासून काहीच फरक पडत नाही.’

Web Title: Jennifer Aniston's husband Brad Pitt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.