‘लाइफ’च्या प्रमोशनसाठी जेक जिलएनहॉल आणि रेबेका फर्ग्युसन पॅरिसमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 19:54 IST2017-03-22T14:24:35+5:302017-03-22T19:54:35+5:30

हॉलिवूडचा बहुचर्चित ‘लाइफ’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार असून, त्याच्या प्रमोशनसाठी अभिनेता जेक जिलएनहॉल आणि अभिनेत्री रेबेका फर्ग्युसन नुकतेच ...

Jake Zillenhall and Rebecca Ferguson for the promotion of 'Life' in Paris! | ‘लाइफ’च्या प्रमोशनसाठी जेक जिलएनहॉल आणि रेबेका फर्ग्युसन पॅरिसमध्ये!

‘लाइफ’च्या प्रमोशनसाठी जेक जिलएनहॉल आणि रेबेका फर्ग्युसन पॅरिसमध्ये!

लिवूडचा बहुचर्चित ‘लाइफ’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार असून, त्याच्या प्रमोशनसाठी अभिनेता जेक जिलएनहॉल आणि अभिनेत्री रेबेका फर्ग्युसन नुकतेच पॅरिस आणि बर्लिनमध्ये गेले होते. सायन्स फिक्शन असलेल्या या सिनेमाचा प्रोमो पॅरिसमध्येच रिलीज करण्यात आला होता. यावेळी हे दोघेही स्टार्स उपस्थित होते.

त्याचबरोबर गेल्या १४ मार्च रोजी जर्मनी, बर्लिनच्या अ‍ॅक्डेमी डेन कुईनस्ते येथे सिनेमाचे प्रमोशन करण्यात आले. यावेळी जेक आणि रेबेका यांनी फोटोशूटदेखील केले. सायन्स फिक्शनवर आधारित असलेला ‘लाइफ’ या सिनेमात मंगळ ग्रहावर सजीवाचा शोध घेताना होणाºया घटना अद्भुत घटना दाखविण्यात येणार आहेत.

डेनियल एस्पिनोसा यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात जबरदस्त सायन्स अ‍ॅडवेंचर्स दाखविण्यात आलेले आहे. डेडपोल अभिनेता रायन रोनाल्ड्स याने पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने सिनेमाला एक उंची मिळवून दिली आहे. त्याचबरोबर जेकसोबतची त्याची केमिस्ट्रीही बघण्यासारखी असेल. दरम्यान, सध्या जेक आणि रेबेका सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Jake Zillenhall and Rebecca Ferguson for the promotion of 'Life' in Paris!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.