​जेक जिलेनहालला वाटायची लोकांची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 14:19 IST2016-11-06T14:07:44+5:302016-11-06T14:19:02+5:30

जेक जिलेनहाल त्याच्या ‘ब्रोकबॅक माउंटेन’मधील भूमिकेसाठी जगप्रसिद्ध आहे. आॅस्कर नामांकित जेक यावर्षी टॉम फोर्ड दिग्दर्शित ‘नॉक्टर्नल अ‍ॅनिमल्स’ या चित्रपटासाठी ...

Jake Zillenahal feared the fear of the people | ​जेक जिलेनहालला वाटायची लोकांची भीती

​जेक जिलेनहालला वाटायची लोकांची भीती

क जिलेनहाल त्याच्या ‘ब्रोकबॅक माउंटेन’मधील भूमिकेसाठी जगप्रसिद्ध आहे. आॅस्कर नामांकित जेक यावर्षी टॉम फोर्ड दिग्दर्शित ‘नॉक्टर्नल अ‍ॅनिमल्स’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. विविध चित्रपट महोत्सवात या फिल्मचे कौतुक झाले. विशेष करून जेकच्या अभिनयाला समीक्षकांनी दाद दिली. 

असे असूनही तो म्हणतो की, ‘लोक माझ्याबद्दल काय विचार करतील याची मला भीती वाटायची. सुरुवातीला मी याबाबत खूप विचार करायचो. कालांतराने मी प्रेक्षकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आता केवळ कलाकार म्हणून मी काम करतो. प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण भूमिकांतून सामोरे जाण्याचा मी प्रयत्न करतो.’

                                   

फॅशनमध्ये क्रांती घडून आणल्यानंतर चित्रपटसृष्टीत ‘अ सिंगल मॅन’द्वारे धमाकेदार पदार्पण केलेल्या टॉम फोर्डचा हा दुसरा चित्रपट आहे. प्रसिद्ध डिझायनरसोबत काम करतानाचा अनुभव तो सांगतो की, ‘तो खूप हुशार आणि समजुतदार माणूस आहे. अनेक दिग्दर्शकांना अभिनेत्यांशी कसं वागावं हेच कळत नाही. परंतु टॉम त्याला अपवाद म्हणावा लागेल. त्याला माहितीए की, त्याला काय करायचे आणि मग तशा प्रकारे तो आम्हाला सुचना करीत असे.’

                                   

चित्रपटाची स्क्रीप्ट वाचल्यानंतर जेक खूप प्रभावित झाला. वाचतानाच मला कथेविषयी विविध प्रश्न पडू लागले, डोक्यात विचारचक्र सुरू झाले. तुम्हाला विचार करायला भाग पाडणारी पटकथा मिळणे फार दुर्मिळ असते. त्यामुळे टॉमने जेव्हा मला हा रोल आॅफर केला मी नाही म्हणूनच शकलो नाही.

                                   
                                              नॉक्टर्नल अ‍ॅनिमल्स : अ‍ॅरॉन टेलर जॉन्सन, टॉम फोर्ड, एमी अ‍ॅडम्स आणि जेक जिलेनहाल

‘नॉक्टर्नल अनिमल्स’मध्ये जेकबरोबर एमी अ‍ॅडम्स आणि मायकल शॅनन प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाला मिळणारे पॉझिटिव्ह रिव्ह्युवज् पाहता यंदाच्या आॅस्कर पुरस्कारांच्या स्पर्धेत त्याने चांगलीच आघाडी घेतली आहे.

Web Title: Jake Zillenahal feared the fear of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.