एडलेला व्हायचेय दुसऱ्यांदा आई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 20:11 IST2016-10-18T20:08:11+5:302016-10-18T20:11:30+5:30
अनेक सेलिब्रेटींना आई होणे म्हणजे आपल्या करिअरला कायमचा ‘राम राम ठोकणे’ असे वाटते. परंतु याला ‘हॅलो’ गायिका एडले अपवाद ...

एडलेला व्हायचेय दुसऱ्यांदा आई!
अ ेक सेलिब्रेटींना आई होणे म्हणजे आपल्या करिअरला कायमचा ‘राम राम ठोकणे’ असे वाटते. परंतु याला ‘हॅलो’ गायिका एडले अपवाद आहे. एडलेने नुकतेच एका कॉन्सर्टमध्ये दुसऱ्यांदा आई होण्याची इच्छा असल्याचे जाहीर केले.
लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडलेली एडले जगातील सर्वोत्कृष्ट गायिकांपैकी एक मानली जाते. तिच्या ‘२१’ या अल्बमला सर्वकालीन श्रेष्ठ अल्बम म्हणून बिलिबोर्ड नियतकालिकाने मान्यता दिलेली आहे. यशस्वीतेच्या शिखरावर विराजमान एडलेला मात्र आई होणे म्हणजे करिअर संपणे असे वाटत नाही.
अमेरिकेतील नॅशविले येथील कॉन्सर्टमध्ये चाहत्यांशी संवाद साधत असताना तिने सांगितले की, मला दुसऱ्यांदा आई होण्याची ओढ निर्माण झाली आहे.
ती म्हणाली, ‘माझा पहिला मुलगा एँजेलो आता लवकरच चार वर्षांचा होणार आहे. म्हणजे तो आता माझे तान्हुले बाळ राहिला नाही. मला दुसऱ्या अपत्याचे वेध लागले आहे. मला पुन्हा एकदा मातृत्वाचा आनंद घ्यायचा आहे.’
![Adele Son Angelo]()
एडले आणि मुलगा एँजेलो
हे वाचून तुम्ही लगेच काही अंदाज-ठोकताळे बांधू नका. कारण तिने यावेळी असेही सांगितले की, मी प्रेग्नंट नसून सध्या सुरू असलेल्या ‘वर्ल्ड टूर’ संपेपर्यंत तरी मी आई होणार नाही. पण मी याविषयी खूप एक्सायटेड आहे.
cnxoldfiles/a> या गाण्याने पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक डाऊनलोड झाल्याचा अनोखा विक्रम नोंदवला होता. लाँच झाल्यानंतर पहिल्या सातच दिवसांत तब्बल अकरा लाखांपेक्षा जास्त लोकांनी ते डाऊनलोड केले होते.