ब्रॅड आणि मारिओनने दिले इंटिमेट सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 18:52 IST2016-11-17T18:52:43+5:302016-11-17T18:52:43+5:30

​हॉलिवूड अभिनेत्री मारिओन कोटिलॉर्ड आणि अभिनेता ब्रॅड पिट यांनी आगामी चित्रपट ‘एलाइड’साठी इंटिमेट सीन दिले आहेत. त्यामुुळे सध्या दोघेही चर्चेत आहेत.

Intimate scenes given by Brad and Marion | ब्रॅड आणि मारिओनने दिले इंटिमेट सीन

ब्रॅड आणि मारिओनने दिले इंटिमेट सीन

लिवूड अभिनेत्री मारिओन कोटिलॉर्ड आणि अभिनेता ब्रॅड पिट यांनी आगामी चित्रपट ‘एलाइड’साठी इंटिमेट सीन दिले आहेत. त्यामुुळे सध्या दोघेही चर्चेत आहेत. 
यावेळी ४१ वर्षीय मारिओनने सांगितले की, शूटिंगदरम्यान ब्रॅडसोबत इंटिमेट सीन देणे मला अवघड वाटत होते.  हा सीन ब्रॅडसोबत एका कारमध्ये बसून शूट करायचा होता. एका रेतीच्या वादळानंतर दोघेही एकत्र येतात अन् त्यांच्यात हा सीन शूट करायचा असतो. हा सीन देणे माझ्यासाठी खूपच कठीण काम होते. त्यामुळे आम्ही यासाठी खूप प्रॅक्टिस केली. हे विचित्र वाटत होते. 
मारिओनने चित्रपटासाठी ब्रॅडला फ्रेंच बोलणे शिकवले असल्याचे समजते. ‘एलाइड’ हा चित्रपट एका कॅनेडिअन गुप्तचर अधिकाºयावर (पिट) आधारित आहे. ज्याची भेट दुसºया महायुद्धादरम्यान फ्रेंच रेसिस्टेंसशी संबंधित असलेल्या मारिओन कोटिलॉर्ड हिच्याशी होत असते. 


मारिओनने दिलेल्या माहितीनुसार, पिट फ्रेंच शिकायला तयार होते. ही बाब माझ्यासाठी प्रभावित करणारी होती. त्यामुळे मी त्यांना यासाठी मदत केली. मारिओन गेल्या काही दिवसांपासून ब्रॅड पिट आणि अ‍ॅँजेलिना जोली यांच्यातील निर्माण झालेल्या तणावास कारणीभूत असल्याची चर्चा होती. 
या चित्रपटादरम्यान तिने ब्रॅड पिट याच्याशी जवळीकता निर्माण केली होती. तसेच ती कुठल्या ना कुठल्या कारणाने ब्रॅडला भेटत असे. विशेष म्हणजे ब्रॅडही तिच्या भेटीमुळे प्रभावित होत असे, यामुळे बºयाचदा ब्रॅड आणि अ‍ॅँजेलिनामध्ये वाद निर्माण होत असत, अशी माहितीही समोर आली होती. 
त्यात या चित्रपटासाठी दोघांनी इंटिमेट सीन दिल्याने दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 


Web Title: Intimate scenes given by Brad and Marion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.