जोनासच्या गर्लफ्रेंडची ही सवय ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 22:21 IST2016-12-17T22:11:48+5:302016-12-17T22:21:47+5:30

गायक जो जोनास गर्लफ्रेंड सोफी टर्नरवर जीवापाड प्रेम करतो. मात्र या प्रेमामागचे कारण तुम्ही ऐकाल तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय ...

If you love this habit of Jonas girlfriends, you will be shocked! | जोनासच्या गर्लफ्रेंडची ही सवय ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल!

जोनासच्या गर्लफ्रेंडची ही सवय ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल!

यक जो जोनास गर्लफ्रेंड सोफी टर्नरवर जीवापाड प्रेम करतो. मात्र या प्रेमामागचे कारण तुम्ही ऐकाल तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तरुणांची त्यांच्या गर्लफ्रेंडकडून जी इच्छा असते, ती इच्छा जोनासची पूर्ण होत असल्यानेच तो त्याच्या गर्लफ्रेंडवर प्रेम करतो. 

धक्का बसला ना, तर ऐका... जोनासची गर्लफेंड सोफी टर्नर जोनासवर ऐवढी उधळपट्टी करतेय की, त्याला कधीच तिच्यासाठी खर्च करावा लागत नाही. विशेष म्हणजे आतापर्यंत जेव्हा-जेव्हा जोनास सोफीबरोबर डेटवर गेला तेव्हाचा संपूर्ण खर्च सोफीनेच केला. 

पेजसिक्स डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जोनास गेल्या एक महिन्यापासून ‘गेम आॅफ थ्रोन्स’ची अभिनेत्री सोफी टर्नर हिच्याशी डेटिंग करीत आहे. तो तिच्यावर यासाठी फिदा झाला आहे की, त्याला तिच्यावर अद्यापपर्यंत एक डॉलरचाही खर्च करावा लागला नाही. डेट्सच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी तीच करीत असल्याने जोनास भलताच खूश आहे. 

सूत्रानुसार, जोनासने आतापर्यंत ज्या - ज्या मुलींना डेट केले आहे, त्यासर्व मुलींवर त्याला प्रचंड खर्च करावा लागला आहे. मात्र जेव्हापासून सोफी त्याच्या आयुष्यात आली आहे, तेव्हापासून त्याच्या खिशाला झळ बसणे बंद झाली आहे. एकदा जोनासने सोफीला विमान प्रवासाचा खर्च मी करणार असल्याचे सांगितले. त्यावर ती संतप्त झाली. तिने त्याला खर्च न करू देता स्वत:च्या प्रवासाच्या तिकिटांपासून ते हॉटेलपर्यंतचा सर्व खर्च पेलला. सोफीचे हे वागणे जोनासला कधी-कधी खटकत असले तरी, तो तिच्या या स्वभावावर फिदा आहे, हे मात्र तेवढेच खरे आहे. 

जेव्हा जोनासला याविषयी विचारण्यात आले तेव्हा मात्र जोनासने या प्रश्नाला बगल देण्यासाठी मी तिच्या हॉट अ‍ॅण्ड सेक्सी फिगरवर फिदा असल्याचे सांगितले. तसेच तिच्या खर्चिक स्वभावाबाबत चिंतित असल्याचेही त्याने म्हटले. पण काहीही जोनाससारखी गर्लफें्रड सगळ्यांना मिळो, अशी तरुणांची भावना होणार नाही, तरच नवल. 



जोनास गर्लफ्रेंड सुफी टर्नरसोबत एका प्रेक्षणीयस्थळी

Web Title: If you love this habit of Jonas girlfriends, you will be shocked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.