Hotness Reloaded : प्लस साइज मॉडेल एश्ले ग्राहमने पुन्हा लावला बिकिनीत तडका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 14:25 IST2017-03-23T08:54:44+5:302017-03-23T14:25:42+5:30

प्लस साइज मॉडेल म्हणून जगभरात नावलौकिक मिळविलेल्या एश्ले ग्राहम हिने नुकतेच ‘स्विमसूट’साठी ब्लॅक बिकिनीत हॉट फोटोशूट केले असून, तिच्या ...

Hotness Reloaded: Plus Size Model Ashley Graham Launches Bikini Tadka !! | Hotness Reloaded : प्लस साइज मॉडेल एश्ले ग्राहमने पुन्हा लावला बिकिनीत तडका!!

Hotness Reloaded : प्लस साइज मॉडेल एश्ले ग्राहमने पुन्हा लावला बिकिनीत तडका!!

लस साइज मॉडेल म्हणून जगभरात नावलौकिक मिळविलेल्या एश्ले ग्राहम हिने नुकतेच ‘स्विमसूट’साठी ब्लॅक बिकिनीत हॉट फोटोशूट केले असून, तिच्या फोटोंनी सध्या चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. फोटोंमधील एश्लेचा अंदाज खूपच सेक्सी असल्याने हे फोटो बघण्यासाठी तिच्या फॅन्सची गर्दी होत आहे. 





फ्लोरिडा येथे केलेल्या फोटोशूटमध्ये एश्ले ब्लॅक बिकिनीत फोटोग्राफरला पोज देताना दिसत आहे. काही फोटोज् समुद्रात तर काही फोटो बिचवर शूट केले असून, एश्लेचा डबल साइज फिगर आकर्षित करणारा आहे. बिचवरील रॉकवर बसलेले तर काही झोपलेल्या अवस्थेतील एश्लेच्या फोटोंनी सध्या सगळीकडे आग लावली आहे. 





काही फोटोंमध्ये तर फोटोग्राफरदेखील दिसत असल्याने, तिचे हे फोटोज् सध्या चर्चेत आहेत. एश्ले तिच्या गार्जियस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिला तिच्या डबल साइजवर गर्व असून, यामुळेच तिला जगभरात प्रसिद्धी मिळाल्याचे ती सांगते. एश्लेने रॅम्पवॉकदेखील केला असून, तिचा हॉट अंदाज आतापर्यंत सगळ्यांनाच भावत आला आहे. 





२००१ पासून मॉडेलिंग करिअरला सुरुवात करणाºया एश्लेने अल्पावधितच आपल्या डबल साइज फिगरमुळे नावलौकिक मिळवला. मॉडेलिंग व्यतिरिक्त एश्ले चॅरिटी आणि कम्युनिटी सर्व्हिसचेही काम करते. एश्ले पहिली डबल साइज मॉडेल आहे जी, ब्रिटिश आणि अमेरिकन वोग मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली होती. एश्लेला हायस्कूलच्या जीवनातच मॉडेलिंगची आॅफर मिळाली होती. आतापर्यंत तिने अनेक स्विमवियर ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले आहे. २०१६ मध्ये एश्लेने तिची पहिली स्विमवियर लाइन लॉन्च केली होती. 





२०१० मध्ये जस्टिन एरिनसोबत विवाहाच्या बंधनात अडकलेली एश्ले दोन मुलांची आई आहे. एश्लेला तिच्या डबल साइज फिगरवर गर्व असून, यामुळेच तिला मॉडेलिंग क्षेत्रात वेगळी छाप पाडणे शक्य झाल्याचे ती म्हणते. एश्लेने आतापर्यंत अनेक ब्रॅण्डसाठी फोटोशूट करताना आपल्या सौंदर्याच्या अदांनी लोकांना घायाळ केले आहे. 

Web Title: Hotness Reloaded: Plus Size Model Ashley Graham Launches Bikini Tadka !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.