HOTNESS OVERLOADED: बियॉन्सेच्या हॉट अँड सेक्सी ‘प्रेग्नंट’ फोटोजमुळे इंटरनेटवर गदारोळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 21:24 IST2017-02-02T15:54:35+5:302017-02-02T21:24:35+5:30
दुसऱ्यांदा आई होणाऱ्या बियॉन्सेने अत्यंत तोकड्या कपड्यांमधील तिचे गर्भवास्थेतील पोट दाखवणारे फोटोज् तिच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केले आहेत. बियॉन्सेचे हे फोटो पाहून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू झाली.

HOTNESS OVERLOADED: बियॉन्सेच्या हॉट अँड सेक्सी ‘प्रेग्नंट’ फोटोजमुळे इंटरनेटवर गदारोळ!
आ तरराष्ट्रीय सिंगर बियॉन्से जे करते, ती जागतिक बातमी बनते. आपल्या गाण्यांनी सगळ्यांना वेड लावल्यानंतर बियॉन्सेने आता तिच्या ‘प्रेग्नंसी’ फोटोतून जगभरातील लोकांना हैराण करून सोडले आहे. सोशल मडियावर तिने अपलोड केलेल्या ‘हॉट अँड सेक्सी’ प्रेग्नंट फोटोज् पाहून नेटिझन्समध्ये ‘उधम मच गया है!’
दुसऱ्यांदा आई होणाऱ्या बियॉन्सेने अत्यंत तोकड्या कपड्यांमधील तिचे गर्भावस्थेतील पोट दाखवणारे फोटोज् तिच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केले आहेत. बियॉन्सेचे हे फोटो पाहून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू झाली. बियॉन्से व तिचा पती जे झी दुसऱ्यांदा आई-बाब होणार असून लवकरच ती जुळ्यांना जन्म देणार आहे.
नुकतेच शेअर केलेल्या फोटोंमध्ये बियॉन्सेचे ‘अंडरवॉटर’ फोटोशूट आहे. आई होणार असल्याची घोषणा करताना तिने शेअर केलेला फोटो ‘इन्स्टाग्राम’वर सर्वाधिक लाईक केलेला फोटो बनला आहे. आतापर्यंत या फोटोला ८० लाखांपेक्षा (८ मिलियन) जास्त लाईक केले गेलेले आहे.
![beyonce pregnant]()
![beyonce pregnant1]()
![beyonce pregnant2]()
![beyonce pregnant4]()
शेअर केलेल्या नव्या फोटोज्मध्ये काही ‘जीआयएफ’सुद्धा आहेत. त्याच बरोबरच तिची मुलगी ब्ल्यू आईव्हीसोबतचे फोटोज्ही आहेत. तिची ‘ड्यू डेट’ अद्याप जाहीर केलेली नसल्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळ्याला ती हजेरी लावणार का यावर प्रश्नचिन्ह आहेत. यंदाच्या ‘ग्रॅमी’मध्ये बियॉन्सेला नऊ नामाकंने मिळालेली आहेत. त्यामध्ये ‘लेमोनेड’साठी अल्बम आॅफ द इयर, साँग आॅफ द इयर (फॉर्मेशन) यांचाही समावेश आहे.
![beyonce pregnant5]()
![beyonce pregnant7]()
![beyonce pregnant8]()
![beyonce pregnant9]()
विशेष म्हणजे यंदा प्रमाणे बियॉन्सेने ब्ल्यू आईव्हीच्या जन्माचीदेखील अशीच सरप्राईजिंग घोषणा केली होती. २०११ साली ‘एम टीव्ही व्हिडिओ म्युझिक अवॉर्ड्स’मध्ये ऐन सादरीकरणा दरम्यान तिने स्टेजवरच पोटावरून हात फिरवत आपण आई होणार असल्याची घोषणा केली होती.