तीन लग्न मोडली, आता २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडनेही सोडली साथ; 'या' हॉलिवूड स्टारचे ब्रेकअप चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 01:55 PM2024-02-23T13:55:36+5:302024-02-23T13:58:53+5:30

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझ पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदु ठरलाय.

hollywood star tom cruise breakup with russian girlfriend elsina khayrova after meeting her chiildren | तीन लग्न मोडली, आता २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडनेही सोडली साथ; 'या' हॉलिवूड स्टारचे ब्रेकअप चर्चेत

तीन लग्न मोडली, आता २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडनेही सोडली साथ; 'या' हॉलिवूड स्टारचे ब्रेकअप चर्चेत

Tom Cruise BreakUp:हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझ संबंधित एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे त्याच्या लाखो चाहत्यांची निराशा झाल्याशिवाय राहणार नाही.

'मिशन इम्पॉसिबल' फेम हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझ पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदु ठरलाय. टॉम क्रुझचा नुकताच ब्रेकअप झाल्याचे वृत्त समोर येत आहे. रशियन गर्लफ्रेंड एल्सीना खैरोवा हिच्यासोबत टॉम क्रुझचा ब्रेकअप झाल्याचं कळतंय. 

टॉमने त्याच्या गर्लफ्रेंड एल्सीना खैरोवा सोबत नातं तोडल्याचा दावा करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून हे कपल एकमेकांना डेट करत होतं. अलिकडेच म्हणजेच १३ फेब्रुवारीला टॉम क्रुझने त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. या नात्याला १० दिवसही उलटले नाही त्यात आता दोघांनी ब्रेकअप केल्याची माहिती मिळतेय. एवढं कमी की काय अभिनेत्याने एल्सीनाचे फोटोही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून डिलीट केले आहेत. 

या दोघांच्या वयामध्ये तब्बल २५ वर्षांचं अंतर असल्याचं समजतंय. दरम्यान त्यांच्या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे असल्याचं सांगितलं जातायत. काहींनी तर थेट या घडल्या प्रकाराला टॉम जबाबदार असल्याचंही म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून हे दोघं लंडनमध्ये एकत्रित राहत होते. त्या दरम्यान, टॉम क्रुझने एल्सीनाच्या मुलांची भेट घेतली. या भेटीनंतर अचानक टॉम क्रुझचं मतपरिवर्तन झालं, आणि त्याने एल्सीनापासून लांब होण्याचा निर्णय घेतला. टॉम क्रुझने तीन वेळा लग्न केलं. पण त्याचा संसार पार काळ टिकला नाही.  याआधीही अशा प्रकारणामुळे अभिनेता दुखावला गेला आहे.

Web Title: hollywood star tom cruise breakup with russian girlfriend elsina khayrova after meeting her chiildren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.