...नवव्यांदा बाप बनला हा हॉलिवूड अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 21:22 IST2017-01-25T15:34:59+5:302017-01-25T21:22:46+5:30

हॉलिवूड अभिनेता मेल गिब्सन नवव्यांदा बाप बनला आहे. ६१ वर्षीय मेल गिब्सनची २६ वर्षाची गर्लफ्रेंड रोजालिंड रॉस हिने गेल्या ...

... Hollywood actor turned ninth father | ...नवव्यांदा बाप बनला हा हॉलिवूड अभिनेता

...नवव्यांदा बाप बनला हा हॉलिवूड अभिनेता

लिवूड अभिनेता मेल गिब्सन नवव्यांदा बाप बनला आहे. ६१ वर्षीय मेल गिब्सनची २६ वर्षाची गर्लफ्रेंड रोजालिंड रॉस हिने गेल्या शनिवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. गिब्सनच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या जन्मामुळे दोघेही आनंदी असून, मुलगा लार्स खूपच गोंडस आणि क्यूट आहे. मेल गिब्सन याला पहिल्या पत्नीपासूनच सात मुले असून, सध्या हा संपूर्ण परिवार एकत्र आनंदी जीवन जगत आहे. 



६१ वर्षीय मेल गिब्सनची २६ वर्षाची गर्लफ्रेंड रोजालिंड रॉस
मेल गिब्सन याचे पहिले लग्न रॉबिन मुरे हिच्याबरोबर १९८० मध्ये झाले होते. लग्नाच्या तब्बल ३१ वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. पुढे २०११ मध्ये त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला. गिब्सनला रॉबिन मुरे हिच्यापासून सात मुले आहेत. हेना (३६), ट्विन्स क्रिस्चियन आणि एडवर्ड (३४), विलियम (३१), लुईस (२८), मिलो (२६) आणि थॉमस (१७) अशी सात मुले आहेत.

याव्यतिरिक्त मेल गिब्सनचे ओकसाना केग्रिगोरीव हिच्यासोबत २००९ ते २०१० दरम्यान संबंध राहिले आहेत. पियोना प्लेअर असलेल्या ओकसाना हिच्यापासून त्याला लुसिया नावाची मुलगी आहे; मात्र एक वर्षापेक्षा अधिक काळ यांच्यातील संबंध टिकू शकले नाहीत. 

त्यानंतर मेल गिब्सन त्याच्यापेक्षा ३५ वर्षांनी लहान असलेल्या लेखिकेसोबत रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या बातम्या पुढे आल्या. रोजालिंड रॉस हिच्यासोबतच्या संबंधांमुळे तो त्यावेळी चांगलाच लाइमलाइटमध्ये आला होता. पुढे दोघांनी त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी जाहीरपणे उलगडा केला होता. आता या दोघांना मुलगा झाला असून, मुलाच्या जन्मामुळे गिब्सन आनंदी आहे. 



मेल गिब्सन याचा परिवार
‘ब्रेवहार्ट (१९९५), द पॅशन आॅफ द क्र ाइस्ट (२००४), द पेट्रियट (२०००), ब्लड फादर (२०१६) यासारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. हॉलिवूडमधील एक वरिष्ठ यशस्वी अभिनेता म्हणून त्याच्याकडे बघितले जात असून, तो त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. 

Web Title: ... Hollywood actor turned ninth father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.