गुड न्यूज! वयाच्या 83 व्या वर्षी 'हा' अभिनेता चौथ्यांदा होणार बाप; 29 वर्षीय गर्लफ्रेंड प्रेग्नेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 03:18 PM2023-05-31T15:18:11+5:302023-05-31T15:27:34+5:30

अल पचीनो आणि त्यांची प्रेग्नेंट गर्लफ्रेंड नूर अल्फल्लाह बाळाच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची माहिती दिली आहे.

hollywood actor al pacino is going to father of fourth child at age of 83 with girlfriend noor alfalah | गुड न्यूज! वयाच्या 83 व्या वर्षी 'हा' अभिनेता चौथ्यांदा होणार बाप; 29 वर्षीय गर्लफ्रेंड प्रेग्नेंट

गुड न्यूज! वयाच्या 83 व्या वर्षी 'हा' अभिनेता चौथ्यांदा होणार बाप; 29 वर्षीय गर्लफ्रेंड प्रेग्नेंट

googlenewsNext

हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अल पचीनो (Al Pacino) वयाच्या 83 व्या वर्षी चौथ्यांदा वडील होणार आहेत. अभिनेत्याच्या प्रतिनिधीने अल पचीनो आणि त्यांची प्रेग्नेंट गर्लफ्रेंड नूर अल्फल्लाह बाळाच्या स्वागतासाठी सज्ज असल्याची माहिती दिली आहे. नूर प्रेग्नेंट असून तिला आता आठवा महिना सुरू आहे.

अल पचीनोची गर्लफ्रेंड प्रेग्नेंट असल्याची माहिती पहिल्यांदा TMZ ने शेअर केली होती. "अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडच्या डिलिव्हरीच्या तारीखेला फक्त एक महिना बाकी आहे" असं अनेक  स्त्रोतांनी TMZ ला सांगितले. 29 वर्षीय नूर अल्फल्लाह एप्रिल 2022 पासून द गॉडफादर स्टारला डेट करत आहे. त्यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या अफवा पहिल्यांदा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा त्यांना पहिल्यांदा एकत्र डिनर करताना पाहिलं गेलं. 

अल पचीनो चौथ्यांदा बाप होत आहे. याआधी, तो त्याची एक्स गर्लफ्रेड आणि एक्टिंग कोच जॉन टॅरंटसह 33 वर्षीय मुलगी ज्युली मेरीचा पिता आहे. तो 1997 ते 2003 या काळात एक्स गर्लफ्रेंड बेवर्ली डी'एंजेलो हिच्यासोबत 22 वर्षीय एंटोन आणि ओलिव्हिया या जुळ्या मुलांचा बाप आहे. तर फिल्म मेकर नूर अल्फल्लाहने यापूर्वी गायक मिक जॅगर आणि मिसेनियर निकोलस बर्गरेन यांना डेट केले होतं.

क्लासिक द गॉडफादर सीरिजमधील स्टार अल पचीनोने 'स्कारफेस', 'सेंट ऑफ ए वुमन', 'हीट', 'सर्पिको', 'सी ऑफ लव्ह', 'द डेव्हिल्स एडवोकेट', 'द इनसाइडर', एंड जस्टिस फॉर ऑल', 'कार्लिटोज वे', 'डॉनी ब्रास्को', ओशन्स थर्टीनया चित्रपटात काम केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: hollywood actor al pacino is going to father of fourth child at age of 83 with girlfriend noor alfalah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.