स्टार वार्स फेम अभिनेत्रीला हृदयविकाराचा तीव्र झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 22:18 IST2016-12-24T22:18:07+5:302016-12-24T22:18:07+5:30

स्टार्स वार्स फेम अभिनेत्री तथा लेखिका कॅरी फिशर हिला हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. लंडन येथून विमानाने प्रवास करताना लॉस ...

Heart attack for star wars fame actress | स्टार वार्स फेम अभिनेत्रीला हृदयविकाराचा तीव्र झटका

स्टार वार्स फेम अभिनेत्रीला हृदयविकाराचा तीव्र झटका

टार्स वार्स फेम अभिनेत्री तथा लेखिका कॅरी फिशर हिला हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. लंडन येथून विमानाने प्रवास करताना लॉस अ‍ॅँजेलिस येथे विमान लँडिग करीत असतानाच तिची तब्येत बिघडली. तिला अत्यावस्थ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करावे लागले. 

कॅरी फिशरचा लहान भाऊ टोड फिशरने सांगितले की, कॅरीची प्रकृती गंभीर आहे. तिला उपचारासाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तिच्यावर तज्ज्ञ डॉक्टर लक्ष ठेवून असून, तिची तब्येत सातत्याने घालवत आहे. टोडने सांगितले की, कॅरीच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, असे म्हणणे सध्या तरी संयुक्तिक नाही. त्यामुळे मी सांगू शकत नाही की, तिची तब्येत बरी आहे. 

स्टार वार्समध्ये प्रिसेंस लियाची भूमिका साकारणारी कॅरी फिशर तिच्या नव्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी लंडनहून लॉज अ‍ॅँजेलिसला जात होती. विमान उतरण्याच्या १५ मिनिट अगोदरच तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यात तिची तब्येत जबरदस्त खालावली. विमानात असलेल्या अत्यावश्यक उपचार सुविधा तिला देण्यात आल्या. मात्र तब्येत झपाट्याने बिघडत असल्याने तिला यूसीएलए मेडिका सेंटर येथे दाखल करावे लागले. 

दरम्यान, कॅरीच्या तब्येतीची वार्ता सोशल मीडियावर वाºयासारखी पसरल्याने तिच्या फॅन्समध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी याकरिता प्रार्थना केली जात आहे. 


Web Title: Heart attack for star wars fame actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.