तो आला,त्याला पाहिलं आणि जस्टिनने चाहत्यांना असं गंडवलं? जाणून घ्या नेमकं काय घडलं जस्टिनच्या त्या कॉन्सर्टमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 11:40 IST2017-05-12T06:10:53+5:302017-05-12T11:40:53+5:30
गेल्या अनेक महिन्यांपासून संगीतप्रेमींना जस्टिन बिबरला लाइव्ह ऐकण्याची उत्कंठा होती. तो आला ,त्याला पाहिलं, आणि त्याने जिंकलं असे आतापर्यत ...

तो आला,त्याला पाहिलं आणि जस्टिनने चाहत्यांना असं गंडवलं? जाणून घ्या नेमकं काय घडलं जस्टिनच्या त्या कॉन्सर्टमध्ये!
ग ल्या अनेक महिन्यांपासून संगीतप्रेमींना जस्टिन बिबरला लाइव्ह ऐकण्याची उत्कंठा होती. तो आला ,त्याला पाहिलं, आणि त्याने जिंकलं असे आतापर्यत ज्यांनी ज्यांनी पॉपस्टार जस्टिन बिबरचा कॉन्सर्ट पाहिला त्यांनी असेच सूर आळवल्याचे पाहायला मिळाले. मात्र जरा थांबा, विचार करा कॉन्सर्टला तुम्ही तासन तास रांगेत उभे राहून त्या कॉन्सर्टचे तिकीट मिळवले. त्या कॉन्सर्टचे एक तिकीट मिळवण्यासाठी तुम्ही हजारों रूपये खर्च केले. दोन तास उभे राहून या कॉन्सर्टची मजाही लुटली. ते खरंच लाईव्ह सुरु होतं का?तर नाही, जस्टिन बिबबरने स्टेजवर फक्त आणि फक्त लिप सिंक केलं. बाकी गाणी तर पाठीमागून वाजवली जात होती. होय, जस्टिनने त्याच्या कॉन्सर्टमध्ये एक गाणं सुध्दा गायलं नाही. त्यावेळी त्याचे फॅन्स जे काही ऐकत होते ते सगळं काही रेकॉर्डेड असल्याची माहिती मिळतेय.आता मात्र जस्टिनच्या कॉन्सर्टमधला हा प्रकार उघड झाल्यानंतर त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर जस्टिनचे चाहते आता त्याच्या प्रेमाचे गोडवे गात नसून पश्चाताप व्यक्त करताना दिसतायेत.त्यामुळे जस्टिनने त्यांच्या चाहत्यांची पुरती निराशा केल्याचे पाहायला मिळत आहे.घडलेल्या प्रकारावरून त्याने पाहिलं त्याने जिंकलं असे नसून त्याने त्यांच्या चाहत्यांना गंडवलं असेच सूर ऐकायला मिळत आहे.सोशल मीडियावर या सगळ्या प्रकारानंतर चाहत्यांचा संताप पाहायला मिळतोय. आधीच कथित मेगा शोच्या ढिसाळ नियोजनावर बीटाऊनच्या दिग्गज सेलिब्रिटींनी ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला होता. आता या फसवुकीच्या प्रकाराने जस्टिन बिबर भारतीय संगीतप्रेमींच्या मनातून स्थान गमावून बसला असं म्हटल्यास चुकीचं ठरु नये.