पॉप स्टार बियॉन्सेच्या जुळ्या मुलांची झलक तुम्ही पाहिली का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 16:01 IST2017-07-14T10:29:56+5:302017-07-14T16:01:22+5:30
नुकतेच जुळ्या मुलांना जन्म देणाºया पॉप स्टार बियॉन्से नोल्स हिने आपल्या मुलांची पहिली झलक दाखविली आहे.
पॉप स्टार बियॉन्सेच्या जुळ्या मुलांची झलक तुम्ही पाहिली का?
न कतेच जुळ्या मुलांना जन्म देणाºया पॉप स्टार बियॉन्से नोल्स हिने आपल्या मुलांची पहिली झलक दाखविली आहे. बियॉन्सेने मुलांसोबत अगदी तिच्या हटके अंदाजातील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एक महिन्यापूर्वी बियॉन्सेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यानंतर पहिल्यांदाच तिने तिच्या मुलांची झलक दाखविली आहे. फोटोमध्ये बियॉन्सेचे वजन खूपच कमी दिसत आहे. दोन्ही मुलांना तिने कडेवर घेतलेले आहे. वास्तविक बियॉन्सेने या मुलांना जन्म कधी दिला याबाबतची माहिती कोणाकडेच नाही. मात्र बियॉन्सेने शेअर केलेल्या फोटोवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, १४ जुलैला ही मुले एक महिन्याचे झाली असावीत.
कारण हा फोटो शेअर करताना बियॉन्सेने लिहिले की, ‘सर कार्टर आणि रूमी आज एक महिन्याची झाली आहे.’ बियॉन्सेने हा फोटो शेअर करताच केवळ अर्ध्या तासातच दीड लाखांपेक्षा अधिक चाहत्यांनी तिला कमेण्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. बियॉन्सेने या फोटोच्या माध्यमातून केवळ मुलांची झलकच दाखविली नाही तर, त्यांची नावेही जाहीर केली. बियॉन्सेने एक फेब्रुवारी रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गर्भावस्थेतील काही फोटो पोस्ट करून त्याबाबतचा खुलासा केला होता. पुढे गर्भावस्थेतील अनेक फोटोज् तिने शेअर करीत धूम उडवून दिली होती. काही फोटोंमध्ये ती, मुलगी ब्लू आणि पती जे यांच्याबरोबर दिसत होती.
बियॉन्सेला एक पाच वर्षांची ब्लू नावाची मुलगी आहे. बियॉन्से हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी आहे. नुकत्याच बिझनेस साप्ताहिकाने फोर्ब्सची जगभरातील शंभर श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली होती. यामध्ये बियॉन्से दुसºया स्थानी होती. गेल्यावर्षीही तिला या यादीत स्थान मिळाले होते. परंतु त्यावेळी तिचे नाव ३४व्या क्रमांकावर होते. यावेळेस तिने झेप घेत थेट दुसरे स्थान गाठले आहे.