​कॅन्सरग्रस्त बाल चाहतीसाठी हॅरीचा मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 16:21 IST2016-11-05T16:21:00+5:302016-11-05T16:21:00+5:30

पॉप स्टार आणि प्रसिद्ध बॉय बँड ‘वन डिरेक्शन’ मेंबर हॅरी स्टायलसने एका चार वर्षीय कॅन्सरग्रस्त चाहतीसाठी स्पेशल व्हिडियो संदेश ...

Harry's message for cancerous hair want | ​कॅन्सरग्रस्त बाल चाहतीसाठी हॅरीचा मेसेज

​कॅन्सरग्रस्त बाल चाहतीसाठी हॅरीचा मेसेज

प स्टार आणि प्रसिद्ध बॉय बँड ‘वन डिरेक्शन’ मेंबर हॅरी स्टायलसने एका चार वर्षीय कॅन्सरग्रस्त चाहतीसाठी स्पेशल व्हिडियो संदेश बनवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘न्युरोब्लास्टोमा’ हा दुर्मिळ कर्करोग असणारी जेसिका व्हेलन सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.

हॅरीला जेव्हा जेसिकाच्या स्थितीबद्दल आणि ती त्याला भेटू इच्छिते असे काळाले तेव्हा त्याने तिच्या वडिलांना फोन केला. तो सध्या अमेरिके त असल्यामुळे भेटणे शक्य नव्हते. मग त्याने तिच्यासाठी एक व्हिडिओ संदेश पाठवण्याचे वचन दिले.

खुद्द हॅरीने स्वत: फोन केल्यामुळे जेसिकाचे वडीलसुद्धा आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की, ‘मला तर विश्वासच बसत नाही की, त्याने फोन करून माझ्या मुलीबद्दल विचारणा केली. तो व्हिडिओ कॉल करणार होता पंरतु तिची अवस्था पाहता ते शक्य नव्हते. म्हणून मग तो आता एक व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवणार आहे.

                                 
                                जेसिका व्हेलन आणि तिचे वडील 

चाहत्यांप्रती हॅरीचे प्रेम पाहता सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. जेसिका केवळ चार वर्षांची जरी असली तरी ती ‘वन डिरेक्शन’ बँडची खूप मोठी चाहती आहे. विशेष करून हॅरी तिचा फेव्हरेट आहे. त्याला भेटण्याची तिने इच्छा व्यक्त केली. मी जर इंग्लंडमध्ये असतो तर नक्कीच जेसिकाला भेटायला गेलो असतो, असे हॅरी म्हणाला.

सध्या तो क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित ‘डनकर्क’ सिनेमात काम करीत असून येथून पुढे तो सोलो सिंगर म्हणून समोर येणार आहे.

Web Title: Harry's message for cancerous hair want

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.