Guardians of the Galaxy Vol. 2: गॅलक्सीच्या रक्षणाकरिता सुपरहिरो टीम सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 15:40 IST2017-02-13T10:10:42+5:302017-02-13T15:40:42+5:30

बहुप्रतीक्षित सुपरहीरो चित्रपट ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी २’च्या निर्मात्यांनी नवीन टीव्ही स्पॉट टीझर रिलीज केले आहे. ५ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात क्रिस प्रॅट, डेव्ह बौटिस्टा, झोई सल्डाना, ब्रॅडली कूपर आणि विन डिझल अशी तगडी स्टार कास्ट आहे.

Guardians of the Galaxy Vol. 2: Superhero team ready to protect galaxy | Guardians of the Galaxy Vol. 2: गॅलक्सीच्या रक्षणाकरिता सुपरहिरो टीम सज्ज

Guardians of the Galaxy Vol. 2: गॅलक्सीच्या रक्षणाकरिता सुपरहिरो टीम सज्ज

वर्षीचा बहुप्रतीक्षित सुपरहीरो चित्रपट ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी २’च्या निर्मात्यांनी नवीन टीव्ही स्पॉट टीझर रिलीज केले आहे. ३० सेंकदाच्या या टीझरमध्ये आपले आवडते सुपरहिरो आकाशगंगेच्या बचावाकरिता शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात. भयावह आणि आक्राळ-विक्रळ परग्रही राक्षसांपासून गॅलक्सीचे रक्षण करण्याची दुसऱ्यांदा त्यांना संधी मिळतेय.

नुकतेच अशी बातमी आली होती, की काही निवडक प्रेक्षकांना हा चित्रपट दाखवण्यात आला असता त्यांनी ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी २’ला शंभर पैकी शंभर गुण दिले. टेस्ट स्क्रीनिंगमध्ये असे पैकीचे पैकी गुण मिळवणारा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे निर्मात्यांचा विश्वास वाढला असून म्हणूनच त्यांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हे टीव्ही स्पॉट टीझर रिलीज केले आहे.

ALSO READ: ​‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी व्हॉल्यूम २’चे ट्रेलर दाखल

चित्रपट बॉक्स आॅफिसवर कशी कामगीरी करेल याचा अंदाज घेण्यासाठी काही सामान्य लोकांची निवड करून त्यांना चित्रपट दाखवण्यात येतो. याला टेस्ट स्क्रिनिंग म्हणतात. मग त्या लोकांना प्रश्न विचारून चित्रपटाबद्दल मत जाणून घेतले जाते. 
     
                                       

येत्या उन्हाळ्यात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून प्रेक्षक आणि निर्माते दोघांना खूप अपेक्षा आहेत. जानेवारी महिन्यात सुपरबाऊल स्पर्धेत दाखवले गेलेले सर्वाेत्तम ट्रेलर म्हणून ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी २’च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दिली होती. डिसेंबर महिन्यात लाँच झालेल्या पहिल्या ट्रेलरला पहिल्याच दिवशी ८.१ कोटी व्ह्युव मिळाले होते. हा मार्व्हल कॉमिक सिनेमासाठी रेकॉर्ड आहे.

ALSO READ: स्टार वॉर्स फिव्हर : या ‘स्पेस मुव्हीज’ तुम्ही पाहाच!

पहिल्या ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी’ चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर ७७३ मिलियन डॉलर्सची तगडी कमाई केली होती. ‘मार्व्ह कॉमिक्स’मधील फारसे लोकप्रिय नसलेल्या कॅरेक्टर्सचा भरणा असलेल्या या चित्रपटाकडून कोणालाच काही अपेक्षा नव्हत्या. उलट मार्व्हल’चा हा पहिला फ्लॉप सिनेमा असेल असेही भाकित वर्तवण्यात आले होते. मात्र सर्वांना खोटे ठरवत ‘गार्डियन्स आॅफ द गॅलक्सी’ने प्रेक्षकांवर जादू करीत बॉक्स आॅफिसवर कमालच केली.

५ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात क्रिस प्रॅट (स्टार-लॉर्ड), डेव्ह बौटिस्टा (ड्रेक्स द डिस्ट्रॉयर), झोई सल्डाना (गेमोरा), ब्रॅडली कूपर (रॉकेट रकून) आणि विन डिझल (ग्रूट) अशी तगडी स्टार कास्ट आहे. तसेच कर्ट रसेल (ईगो), एलिझाबेथ डेबिकी, पॉम क्लेमेंटिफ, क्रिस सुलीवन यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title: Guardians of the Galaxy Vol. 2: Superhero team ready to protect galaxy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.