पाळीव कुत्र्यामुळे फेरिसला पाच हजार डॉलरचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 20:39 IST2016-11-24T20:38:09+5:302016-11-24T20:39:45+5:30

हॉलिवूड अभिनेत्री एना फेरिस सध्या अडचणीत सापडली आहे. एका पशू आश्रय केंद्राला (अ‍ॅनिमल शेल्टर) दत्तक घेतल्याचा करार तोडल्याने तिच्यावर ...

Ferris gets $ 5,000 fine due to pet dog | पाळीव कुत्र्यामुळे फेरिसला पाच हजार डॉलरचा दंड

पाळीव कुत्र्यामुळे फेरिसला पाच हजार डॉलरचा दंड

लिवूड अभिनेत्री एना फेरिस सध्या अडचणीत सापडली आहे. एका पशू आश्रय केंद्राला (अ‍ॅनिमल शेल्टर) दत्तक घेतल्याचा करार तोडल्याने तिच्यावर तब्बल ५००० डॉलरचा दंड आकारण्यात आला आहे. 

वास्तविक एनाचा एक पाळीव कुत्रा अतिशय गंभीर स्थितीत आढळून आला होता. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार फेरिसने चार वर्षांपूर्वी पीट नावाचा एक कुत्रा पाळण्यासाठी घेतला होता. या दरम्यान तिने नॉर्थ हॉलिवूड शेल्टरबरोबर एक करारही केला होता. मात्र तिने हा करार तोडल्याने तिच्यावर आर्थिक दंड आकारला आहे. 

जर फेरिसने या कुत्र्याचा ताबा दुसºया मालकाला दिला, तर तिला दंड भरणे बंधनकारक असेल. ‘नॉर्थ हॉलिवूड शेल्टर’ने सांगितले की, या जखमी कुत्र्याची माहिती आम्हाला फोनद्वारे देण्यात आली होती. ज्यामध्ये हा कुत्रा जखमी अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले होते. 

त्यानंतर शेल्टरतर्फे फेरिसला संपर्क साधण्यात आला, मात्र फेरिसने त्याला फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार फेरिस आणि क्रिस प्रॅट सध्या शहराच्या बाहेर आहेत. अशातही ते पीटला घरी परत आणण्यासाठी योग्य ती व्यवस्था करीत आहेत. 

मात्र फेरीसकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने शेल्टरने पीटसाठी दुसरा परिवार शोधला आहे. मात्र अद्यापपर्यंत पीटला त्या परिवाराच्या ताब्यात दिलेले नाही. 

Web Title: Ferris gets $ 5,000 fine due to pet dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.