अली लार्टर आणि मिला जोवोव्हिचसाठी ‘रेसिडेंट ईव्हिल’ आहे कौटुंबिक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 13:29 IST2017-01-27T07:58:45+5:302017-01-27T13:29:18+5:30

साय-फाय अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटांच्या चाहत्यांसाठी ‘रेसिडेंट एव्हिल’ हे नाव चिरपरिचित आहे. या सुपरहिट फ्रँचाईजीमधील शेवटचा चित्रपट ‘रेसिडेंट ईव्हिल: द ...

Family experience for Ali Larter and Mila Zawovich is 'Resident Evil' | अली लार्टर आणि मिला जोवोव्हिचसाठी ‘रेसिडेंट ईव्हिल’ आहे कौटुंबिक अनुभव

अली लार्टर आणि मिला जोवोव्हिचसाठी ‘रेसिडेंट ईव्हिल’ आहे कौटुंबिक अनुभव

य-फाय अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटांच्या चाहत्यांसाठी ‘रेसिडेंट एव्हिल’ हे नाव चिरपरिचित आहे. या सुपरहिट फ्रँचाईजीमधील शेवटचा चित्रपट ‘रेसिडेंट ईव्हिल: द फायनल चाप्टर’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मिला जोवोव्हिच स्टारर या सिनेमात अली लार्टरसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘अलाईस’ची सहकारी ‘क्लेर रेडफिल्ड’च्या रुपात ती पुन्हा एकदा दिसणार आहे.

शेवटच्या सिनेमात काम करण्याविषयी ती सांगते की, ‘गेल्या १० वर्षांपासून मी या सिरीजचा भाग आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यातील अनेक आठवणी सिनेमाशी संबंधित आहे. या काळादरम्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. आता या सिरीजचा शेवट होणार म्हणून एक काळ पूर्णत्वास जातोय असे वाटतेय. एक अविस्मरणीय अनुभव होता.’

सहकलाकार आणि प्रमुख नायिका मिलासोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना ती सांगते, ‘मिला खूपच मेहनती आणि उत्कृष्ट अभिनेत्री आहे. एवढ्या सिनेमांत एकत्र काम केल्यामुळे आमची मैत्री चांगलीच फुलली आहे. या चित्रपटाची संपूर्ण धुरा तिच्यावर होती आणि तिने अगदी समर्थपणे ती निभावली. हे तिचेच तर यश आहे की, एवढ्या वर्षांनंतरही सिरीजबाबत चाहते उत्सुक आहेत.’

Milla Jovovich and Ali Larter
रेसिडेंट ईव्हिल-द फायनल चाप्टर: अली लार्टर आणि मिला जोवोव्हिच  

महिला अ‍ॅक्शन हीरो केंद्रस्थानी असणे हे या सिरीजमधील चित्रपटांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे नेहमीच्या ठराविक साच्यापेक्षा वेगळी मांडणी यामध्ये पाहायला मिळते. अत्यंत चांगल्या प्रकारे ‘रेसिडेंट ईव्हिल’चा प्रवास पूर्णविराम घेतोय असे तिला वाटते.

ती म्हणते, ‘या चित्रपटात काम करणे म्हणजे माझ्यासाठी कौटुंबिक अनुभव आहे. आमचा सीन झाला की, मिला आणि मी सेटवरच मुलांसोबत खेळायचो. दिग्दर्शक पॉल अँडरसन आणि मिला पती-पत्नीच असल्यामुळे सेटवरील संपूर्ण वातावरणच घरगुती असल्यासारखे होते.’ येत्या ३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

ALSO READ: ​स्टंटसाठी मिला जोवोव्हिचने सोसल्या नरक यातना

Web Title: Family experience for Ali Larter and Mila Zawovich is 'Resident Evil'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.