अ‍ॅरॉन सॉरकिनने लिहिले मुलीस भावनिक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 10:21 IST2016-11-10T18:20:40+5:302016-11-12T10:21:16+5:30

अमेरिकेत पार पडलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने बहुमत मिळवून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे प्रेसिडेंट बनले. त्यांच्या या अनपेक्षित ...

An emotional letter from the daughter written by Aaron Sorkin | अ‍ॅरॉन सॉरकिनने लिहिले मुलीस भावनिक पत्र

अ‍ॅरॉन सॉरकिनने लिहिले मुलीस भावनिक पत्र

ेरिकेत पार पडलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने बहुमत मिळवून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५वे प्रेसिडेंट बनले.

त्यांच्या या अनपेक्षित विजयाने अनेकांची झोप उडवली आहे. कित्येक लोक आणि सेलिब्रेटी ट्रम्पच्या विजयाचा निषेध सोशल मीडियावर नोंदवत आहेत. आॅस्कर विजेते पटकथाकार (स्क्रीनप्ले लेखक) अ‍ॅरॉन सॉरकिन यांनी तर मुलगी व पत्नीस उद्देशून एक भावनिक पत्र लिहिले असून त्यामध्ये त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

‘द सोशल नेटवर्क’ लेखक लिहितो, ‘संपूर्ण जगासाठी आणि विशेष करून अमेरिकन जनतेसाठी ही फार घातक गोष्ट आहे. मी मतदान केलेला उमेदवार न जिंकण्याची ही काही पहिली वेळ नाही (खरं सांगायचे तर सहाव्यांदा असे झाले!); परंतु प्रथमच एक नालायक, विनाशकारी बुद्धी असणारा, जगाचे ज्ञान नसणारा व ते जाणून घेण्याची क्षमता व इच्छा नसणारा विघातक माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनला आहे.’



सॉरकिन डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा खंदा समर्थक आहे. निवडणुकीच्या निकालानंतर क्लिंटन समर्थकांनी ट्रम्पवर तुफान हल्ला चढवण्यास सुरुवात केली. हा काळा दिवस आहे, विनाशाची सुरुवात आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सर्वच स्तरातून येत होत्या. या निराशेच्या वातावरणातही सकारात्मक प्रकाशाची अशा न सोडण्याचे आवाहन सॉरकिन करतो.

ते पुढे लिहितात, ‘इतिहास साक्षीदार आहे की, जेव्हा जेव्हा अमेरिकेवर मोठे संकट कोसळले, येथील जनतेने धीराने सामोर जात त्यावर वियज मिळवलेला आहे. निराश झालोय पण हताश नाही. आताशी कुठे लढा सुरू झाला आहे. पुर्वजांनी रक्त सांडून घडवलेल्या या महान देशाची वाताहत आम्ही होऊ देणार नाही. खंत मात्र एवढी आहे की, आपण आपल्या मुलांना या संकटापासून वाचू शकलो नाही.’

Web Title: An emotional letter from the daughter written by Aaron Sorkin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.