​एमीने घेतले ८० कोटींचे पेंट हाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 14:35 IST2016-11-02T14:35:04+5:302016-11-02T14:35:04+5:30

हॉलीवूड स्टार एमी शुमरने तिचे स्वप्नातील घर खरेदी केले आहे. तब्बल १२.१ मिलियन डॉलर्स (८० कोटी रु) खर्च करून ...

Eminee has taken 80 million paint house | ​एमीने घेतले ८० कोटींचे पेंट हाऊस

​एमीने घेतले ८० कोटींचे पेंट हाऊस

लीवूड स्टार एमी शुमरने तिचे स्वप्नातील घर खरेदी केले आहे. तब्बल १२.१ मिलियन डॉलर्स (८० कोटी रु) खर्च करून तिने न्यूयॉर्कमध्ये एक आलिशान पेंटहाऊस विकत घेतले आहे. पाच बेडरुमच्या या पेंटहाऊसमध्ये दोन मजले असून एक संपूर्णपणे काचेची भींत आहे ज्याद्वारे न्यूयॉर्क शहरातील हडसन नदी आणि न्यूजर्सीचे विलोभणीय दर्शन होते. 

या घराचे वर्णन करायचे झाले तर, मार्केटमध्ये फार कमी वेळा असे सुंदर आणि दुर्मिळ घर उपलब्ध होते. आधुनिक डिझाईन, हवेशीर, भरपूर प्रकाशमान असणाऱ्या या घरात राहणे म्हणजे एक वेगळाच अनुभव ठरेल. मॅलिबू बीच हाऊस आणि न्यूयॉर्क आर्किटेक्चरचा अद्भूत मिलाफ म्हणजे हे घर.

आतील बाजूने हे ४.५ हजार चौ. फूट तर बाहेरून ३ हजार चौ. फूट जागेवर हे पेंटहाऊस पसरलेले आहे. हे घर खरेदी केल्यावर एमीने तिचे अपर वेस्ट साईड येथील घर विक्रीस काढले. अद्याप तरी त्याची विक्री झालेली नाही. हॉलीवूडमधील अग्रणी स्टार्समध्ये तिचे नाव घेण्यात येते.

असे असुनही ती सांगते, मी आजही माझ्या शाळेतील मैत्रिणींशी कनेक्टेड आहे. एवढेच नाही तिने तिच्या सर्व हायस्कुल फ्रेंडस्साठी ‘द हंगर गेम्स : मॉकिंगजे - पार्ट २’ चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित केला होता.

Web Title: Eminee has taken 80 million paint house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.