दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने कान्स फिल्मोत्सवाच्या सुरक्षेत केली पुन्हा वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 21:12 IST2017-05-04T15:42:25+5:302017-05-04T21:12:25+5:30

या महिन्याच्या १७ तारखेला आयोजित करण्यात आलेल्या ७० व्या कान्स फिल्मोत्सवाच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. फ्रान्स येथे ...

Due to terrorists attack Cannes Film Festival again increased! | दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने कान्स फिल्मोत्सवाच्या सुरक्षेत केली पुन्हा वाढ!

दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने कान्स फिल्मोत्सवाच्या सुरक्षेत केली पुन्हा वाढ!

महिन्याच्या १७ तारखेला आयोजित करण्यात आलेल्या ७० व्या कान्स फिल्मोत्सवाच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. फ्रान्स येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या या आयोजन स्थळाला छावणीचे रूप आले आहे. 

वेरायटी डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, नीसमध्ये गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी कान्स फिल्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नीसपासून केवळ २९ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या कान्स शहरात मिपकोम, मिप टीव्ही यासारख्या बºयाचशा समारंभांचे आयोजन केले जाते. यामुळेच कान्स लॉयंस सध्या त्यांच्या सुरक्षेवर अधिक भर देताना दिसत आहेत. 

महोत्सवात सहभागी होणाºया कलाकारांमध्ये सुरक्षिततेची भावना असावी याच हेतूने सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. कान्स येथील पोलीस प्रमुख येवेस डारोस यांनी सांगितले की, शहराच्या प्रत्येक प्रवेश स्थळांवर आॅटोमॅटिक रिअ‍ॅक्टेबल बोलार्ड्स बसविण्यात आले आहे. ज्याकरिता ६० लाख डॉलरचा खर्च करण्यात आला आहे. त्याचबरोबर मॉक ड्रिलवरही भर दिला जात आहे. 



डारोसने सांगितले की, मी गेल्या ३५ वर्षांपासून या समारंभाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी आव्हानात्मक अन् तेवढाच मजेशीर राहिला आहे; मात्र यावर्षी आमच्यावर प्रचंड जबाबदारी असल्याने त्यात यशस्वी होणे आमच्यासाठी आव्हानात्मक असेल. यावर्षी कान्स फिल्मोत्सवात एकही भारतीय चित्रपट सहभागी झाला नाही. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर आणि दीपिका पादुकोण याठिकाणी कॉस्मेटिक कंपनीच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

२०१५ मध्ये कान्स फिल्मोत्सवाच्या आयोजनाअगोदरच कार्टियर बुटिक येथून सुमारे १९ लाख डॉलरचे दागिने आणि घड्याळे चोरीस गेले होते. अशाप्रकारच्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. सुरुवातीला कॅमेºयांची संख्या ४०० इतकी होती, आता त्यात वाढ करण्यात आली असून, ही संख्या ५५० वर पोहोचली आहे. 

Web Title: Due to terrorists attack Cannes Film Festival again increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.