क्रिस मार्टिनबद्दल तुम्हाला हे माहीत आहे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 22:21 IST2016-12-17T22:17:57+5:302016-12-17T22:21:15+5:30
पापॅ बॅण्ड ‘कोल्डप्ले’चा गायक क्रिस मार्टिन याच्या आवाजावर जगभरातील लोक फिदा आहेत. त्यामुळेच क्रिसचे जगातील कानाकोपºयात फॅन्स आहेत. मात्र ...

क्रिस मार्टिनबद्दल तुम्हाला हे माहीत आहे काय?
प पॅ बॅण्ड ‘कोल्डप्ले’चा गायक क्रिस मार्टिन याच्या आवाजावर जगभरातील लोक फिदा आहेत. त्यामुळेच क्रिसचे जगातील कानाकोपºयात फॅन्स आहेत. मात्र त्याचा आवाज हे एकमेवच त्याचे वैशिष्ट्य नसून, त्याचा दानशूरपणाही कौतुकास्पद आहे.
क्रिस त्याच्या एकूण कमाईच्या १० टक्के रक्कम ही दान करीत असतो. डेलीमेल डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, क्रिसची आई एलिसन यांनी लहानपणापासून त्याला दान करण्याचे महत्त्व सांगितले आहे. त्याच्या पॉकिटमनीतून त्याने दान करावे, असा सल्ला एलिसन त्याला देत असत. कधी-कधी त्या स्वत:च त्याच्या पॉकिटमनीमधून काही रक्कम दान करण्यासाठी घेत असत.
आईने दिलेल्या संस्काराचे क्रिस आज तंतोतंत पालन करताना दिसत आहे. तो त्याच्या एकूण रकमेतील दहा टक्के रक्कम दान करीत आला आहे. याविषयी त्याने सांगितले की, एकदा माझ्या आईने मला ९ डॉलर पॉकिटमनी म्हणून दिले. मला याचे आश्चर्य वाटले की, आईने मला ९ डॉलरच का दिले? मी तिला याविषयी विचारले तेव्हा तिने एक डॉलर दान करण्यासाठी मी अगोदरच माझ्याकडे जमा करून घेतला असल्याचे सांगितले.
क्रिस मार्टिनचा हा आदर्श आता त्याच्या बॅण्डमधील अन्य सदस्यही घेत आहेत. आता ते सुद्धा वेगवेगळ्या २८ संस्थांमधून मिळणाºया कमाईचा १० टक्के हिस्सा लोकांमध्ये दान करीत आहेत. क्रिसची ही दानशूर वृत्ती त्याच्या फॅन्सच्या नजरेत त्याला सर्वोच्च शिखरावर पोहचविणारी आहे, हे मात्र नक्की.
![]()
मार्टिन क्रिस आणि त्याच्या कोल्ड प्ले बॅण्डमधील सदस्य