कान्ये वेस्टला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 21:26 IST2016-12-15T21:26:00+5:302016-12-15T21:26:00+5:30

गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रॅपर कान्ये वेस्टच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सध्या त्याची प्रकृती ठणठणीत असून, ...

Discharge from Kanai West Hospital | कान्ये वेस्टला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

कान्ये वेस्टला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

ल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रॅपर कान्ये वेस्टच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सध्या त्याची प्रकृती ठणठणीत असून, तो काहीकाळ एकांतात राहू इच्छित आहे. 

३९ वर्षीय कान्येला कामाचा थकवा आणि डिहाड्रेशनमुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका कॉन्सर्ट दरम्यान तो स्टेजवरच चक्कर येऊन पडला होता. गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णालयात उपचार घेत असून, त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी, कामापासून दूर राहण्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या कान्ये घरीच असून, आराम करीत आहे. 

मिरर डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, कान्येला अजूनही विश्वास होत नाही की, तो चक्कर येऊन पडला होता. अजून तो त्या दिवसाचा विचार करीत आहे. मात्र किमने त्याला प्रकृतीकडे लक्ष देण्याची एक प्रकारे ताकीद दिल्याने तो स्वत:च्या प्रकृतीविषयी अधिक सजग होण्याचा प्रयत्न करीत आहे. 
क्लोजर या साप्ताहिकाने माहिती दिली की, कान्ये आता सामान्य जीवन जगत असून, कामाकडे परतण्यास उत्सुक आहे. मात्र एकांतात राहण्याची त्याची इच्छा किम आणि त्याच्या नातेवाइकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 



रुग्णालयातून पत्नी किम कर्दाशियन हिच्याबरोबर बाहेर पडताना कान्ये वेस्ट 

Web Title: Discharge from Kanai West Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.