...अखेर डिलन यांनी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 20:04 IST2016-10-29T20:04:57+5:302016-10-29T20:04:57+5:30

साहित्य क्षेत्रासाठी घोषित करण्यात आलेल्या नोबेल पुरस्कारावर चुप्पी साधलेल्या बॉब डिलन यांनी अखेर पुरस्काराविषयी प्रतिक्रिया नोंदवून आयोजकांना दिलासा दिला. ...

Dillon finally responded | ...अखेर डिलन यांनी दिली प्रतिक्रिया

...अखेर डिलन यांनी दिली प्रतिक्रिया

हित्य क्षेत्रासाठी घोषित करण्यात आलेल्या नोबेल पुरस्कारावर चुप्पी साधलेल्या बॉब डिलन यांनी अखेर पुरस्काराविषयी प्रतिक्रिया नोंदवून आयोजकांना दिलासा दिला. ते म्हणाले की, नोबेल पुरस्कार कोणाला नको आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माझ्याकडे बोलण्यास शब्दच नव्हते. 
अमेरिकी गायक-गीतकार डिलन यांना १३ आॅक्टोबर रोजी नोबेल पुरस्कार घोषित केला होता. दोन आठवडे होवूनदेखील त्यांच्याकडून प्रतिक्रिया दिली गेली नसल्याने विविध तर्क-वितर्क लावले जात होते. डिलन पुरस्कार स्वीकारणार नाहीत, अशीही चर्चा रंगली होती. आयोजकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा बराच प्रयत्न केला होता, मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. अखेर घोषणेच्या दोन आठवड्यांनंतर डिलन यांनी अकॅडमीकडे फोन करून पुरस्कारावर प्रतिक्रिया नोंदविल्याने आयोजकांच्या जिवात जीव आला. यावेळी डिलन म्हणाले की, मी पुरस्काराचा स्वीकार करतो. त्यांनी अकॅडमीचे स्थायी सचिव सारा डॅनियसला सांगितले की, नोबेल पुरस्काराची बातमी ऐकल्यानंतर मी अवाक झालो होते. मी या पुरस्काराचा सन्मान करतो. कुठल्याही अटी शर्थीशिवाय मी हा पुरस्कार स्वीकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
अकॅडमीच्या सदस्यांकडून वेळोवेळी संपर्क साधूनदेखील डिलन यांनी प्रतिक्रिया नोंदविली नव्हती. मात्र दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याने अकॅडमीने त्यांचे स्वागत केले. अकॅडमीने याविषयी गेल्या शुक्रवारी सांगितले की, डिलन अवॉर्ड स्वीकारण्यासाठी स्टॉकहोम जाणार की नाहीत, याविषयी अजून निश्चित नाही. या पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व सन्मानार्थींना १० डिसेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 
दरम्यान, डिलन यांचा समारंभातील सहभागाविषयीचा खुलासा ब्रिटनच्या एका वर्तमानपत्रात स्पष्ट करण्यात आला आहे. या वर्तमानपत्रात डिलन यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, जर शक्य झाल्यास मी नक्कीच या समारंभात उपस्थित राहील. खरं तर हा पुरस्कार मिळणे खरोखरच अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार जाहीर होणेच मुळात अविश्वसनीय आहे. जगातला सर्वोत्तम पुरस्कार जर मिळत असेल तर तो कोणाला नको? अशा शब्दात डिलन यांनी त्यांचे पुरस्काराविषयीचे मत व्यक्त केले. 

Web Title: Dillon finally responded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.