‘ट्रिपल एक्स’च्या नव्या पोस्टरमध्येही दीपिकाचा जलवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 15:46 IST2016-12-22T15:29:31+5:302016-12-22T15:46:05+5:30
सध्या हॉलिवूडमध्ये दीपिका पादुकोन आणि प्रियंका चोपडा या दोन अभिनेत्रींच्या नावाची जबरदस्त चर्चा आहे. दोघीही हॉलिवूडपटांमध्ये डेब्यू करीत असून, ...
.jpg)
‘ट्रिपल एक्स’च्या नव्या पोस्टरमध्येही दीपिकाचा जलवा
सध्या हॉलिवूडमध्ये दीपिका पादुकोन आणि प्रियंका चोपडा या दोन अभिनेत्रींच्या नावाची जबरदस्त चर्चा आहे. दोघीही हॉलिवूडपटांमध्ये डेब्यू करीत असून, नव्या वर्षात त्यांचे चित्रपट रिलीज होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रियंकाच्या ‘बेवॉच’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. मात्र त्यात प्रियंकाची एंट्री काही सेकंदाचीच असल्याने तिच्या चाहत्यांचा हिरमोड झाला होता. मात्र प्रियंकाच्या तुलनेत दीपिकाची हॉलिवूड एंट्री अधिक दमदार मानली जात आहे. कारण तिच्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’ या आगामी हॉलिवूडपटाचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले असून, त्यात दीपिकाला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही दीपिकाच्या अॅक्शनचा जलवा डोळे दिपवून टाकणारा होता.
Now that's a team he can work with. Xander Cage is back in the new poster for #xXxTheMovie. In theatres January 20th.
Now that's a team he can work with. Xander Cage is back in the new poster for #xXxTheMovie. In theatres January 20th. pic.twitter.com/Km5W7jZ3IN
— xXx Return of Xander (@xxxMovie) December 19, 2016
ट्रेलरमध्ये ज्या पद्धतीने दीपिकाचे अॅक्शन स्टंट दिसत आहेत, त्यावरून या चित्रपटाच्या रिलीजबाबत तिचे फॅन्स जबरदस्त उत्सुक आहेत. दीपिकाचा हा चित्रपट नव्या वर्षात रिलीज होणार आहे. दरम्यान चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हॅँडलवरून हे पोस्टल रिलीज केले गेले. ज्यामध्ये चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या विन डीजल नंतर दीपिका दिसत आहे. त्याचबरोबर रुबी रोज आणि नीना डोबरेव यांनाही पोस्टरमध्ये स्थान दिले आहे. पोस्टरमध्ये दीपिकासह सर्वच कलाकार हॉट दिसत आहेत. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ही ती टीम आहे ज्यांच्यासोबत काम करता येऊ शकते. जेंडर केज नव्या पोस्टरच्या माध्यमातून तुमच्यासमोर हजर आहे’.
हा चित्रपट वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच २० जानेवारी २०१७ रोजी रिलीज केली जाणार आहे. डीजे कारुसो यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ट्रिपल एक्स सिरीजचा भाग आहे.
Get ready for the Xander Zone. #VinDiesel returns in xXx: Return of Xander Cage this January.
Get ready for the Xander Zone. #VinDiesel returns in xXx: Return of Xander Cage this January. pic.twitter.com/PUCr8a3QAx
— xXx Return of Xander (@xxxMovie) November 1, 2016
Get ready for the Xander Zone. #VinDiesel returns in xXx: Return of Xander Cage this January. (@xxxMovie) November 1, 2016
Get ready for the Xander Zone. #VinDiesel returns in xXx: Return of Xander Cage this January. pic.twitter.com/PUCr8a3QAx
— xXx Return of Xander (@xxxMovie) November 1, 2016