​‘हा’ निर्णय घेणे जेनिफर लॉरेन्ससाठी आहे अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 17:00 IST2016-12-30T17:00:17+5:302016-12-30T17:00:17+5:30

प्रेम माणसाला जगण्याची प्रेरणा देते. ते जगण्यासाठी कारण बनते आणि केवळ जिंवत राहण्यापेक्षा जगायला शिकवते. अशा उत्कट पे्रमाची साथ ...

The decision to make 'this' is impossible for Jennifer Lawrence | ​‘हा’ निर्णय घेणे जेनिफर लॉरेन्ससाठी आहे अशक्य

​‘हा’ निर्णय घेणे जेनिफर लॉरेन्ससाठी आहे अशक्य

रेम माणसाला जगण्याची प्रेरणा देते. ते जगण्यासाठी कारण बनते आणि केवळ जिंवत राहण्यापेक्षा जगायला शिकवते. अशा उत्कट पे्रमाची साथ असेल आपण कोणत्याही संकटाचा यशस्वी सामना करू शकतो. अशीच एक प्रेमकथा आगामी ‘पॅसेंजर्स’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

१२० वर्षांच्या परग्रह प्रवासाला निघालेल्या आॅरोरा लेन (जेनिफर लॉरेन्स) आणि जिम प्रेस्टन (क्रिस प्रॅट) या प्रेमीयुगुलाचा संघर्ष  या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘इमिटेशन गेम’ फेम मॉर्टेन टिल्डम दिग्दर्शित ‘पॅसेंजर्स’ हा सायन्स फिक्शन चित्रपट येत्या ६ जानेवारी रोजी भारतात रिलीज होत आहे. त्यानिमित्त चला तर जाणून घेऊया काय म्हणतेय सिनेमाची मुख्य अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स तिच्या भूमिकेविषयी...

* चित्रपटाविषयी काय सांगशील?

सायन्स-फिक्शन-स्पेस-अ‍ॅक्शन चित्रपटातील प्रेमकथा म्हणजे ‘पॅसेंजर्स’. प्रेरित निष्क्रियता अवस्थेत १२० वर्षांच्या प्रवासाला निघालेले दोन अंतराळवीर ९० वर्षे आधीच जागे होतात. त्यामुळे पुढचे संपूर्ण आयुष्य यानामध्ये केवळ एकमेकांच्या सहवासामध्ये घालवणे अपरिहार्य ठरते. यादरम्यान त्यांच्यामध्ये प्रेम फुलते. प्रेमामुळे त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद सदैव जागृत राहते.

* चित्रपट स्वीकारताना कोणती गोष्ट तुला विशेष भावली?

खरं सांगायचे तर सिनेमाची मूळ कथाच खूप भन्नाट आहे. पृथ्वीसोडून दुसऱ्या ग्रहावर १२० वर्षे प्रवास करून जाण्याचे व पुन्हा १२० वर्षे प्रवास करून पृथ्वीवर परत येण्याचे धारिष्ट्य या चित्रपटातील पात्रांमध्ये आहे. या दरम्यान तुमचे सर्व प्रियजण मृत झालेले असतील. नव्या ग्रहावर शुन्यातून सुरूवात करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. अशी जोखिम उचलणारी व्यक्तीरेखा मला खुप आवडली. सर्व सोडून परग्रहावर जाण्याचा निर्णय घेणे सोपी गोष्ट नाही.

Chris Pratt with Jennifer Lawrence in Passenger
पॅसेंजर्स :  क्रिस प्रॅट आणि जेनेफर लॉरेन्स​

* तु घेशील असा निर्णय?

जर माझ्यावर वेळ आली तर मी असा निर्णय घेईल, असे मला नाही वाटत. माझ्या जवळच्या लोकांना कायमचे सोडून जाण्याचा मी विचारही करू शकत नाही. चित्रपटात भूमिका करणे वेगळी गोष्ट आणि खऱ्या आयुष्यात तसे जगणे वेगळी गोष्ट आहे. प्रियजणांपासून दूर जाण्याचा निर्णय माझ्यासाठी तरी अशक्य आहे. हो जर पृथ्वीवर मोठे संकट आले किंवा येथे जगणेच अवघड झाले तर सगळ्यांनासोबत घेऊन जाईल.

* तुझी भूमिका कशी आहे?

चित्रपटात मी आॅरोरा लेन नावाचे पात्र साकारत आहे. परग्रहावर स्थापन केलेल्या वसाहतीवर गेलेली पहिली व्यक्ती होण्याचे तिचे स्वप्न आहे. म्हणून तर ती १२० वर्षे जाणे आणि १२० वर्षे येण्याच्या मिशनवर जाण्याचा निर्णय घेते. परग्रह वसाहतीमध्ये जीवन कसे असते यावर तिला पुस्तक लिहियाचे असते. परंतु या प्रवासात तिला अनेक अडचणी येतात.

* म्हणजे तु सिनेमात लेखिका आहेस तर...

हो. आॅरोराचे वडील एक प्रसिद्ध लेखक असतात. त्यांच्यासारखे मोठे लेखक होण्याची तिची महत्त्वकांक्षा असते. म्हणून तर ती अशा खडतर प्रवासाला जाण्याचा निर्णय घेते. ती अत्यंत समजुतदार, आशावादी, कुतूहल असणारी मुलगी आहे. तिला अ‍ॅडव्हेंचर आवडते. आयुष्यात काही तरी नवीन गोष्टी अनुभवण्याचा थरार तिला प्रेरणा देतो.

Web Title: The decision to make 'this' is impossible for Jennifer Lawrence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.