गायक क्यूबा गुडिंग सीनियर यांचा कारमध्येच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2017 21:34 IST2017-04-23T16:04:40+5:302017-04-23T21:34:40+5:30

सोल गु्रपचे प्रसिद्ध गायक क्यूबा गुडिंग सीनियर त्यांच्या कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. ते ७२ वर्षांचे होते. वॅराएटी डॉट ...

Death in singer Cuba Gooding Sr. | गायक क्यूबा गुडिंग सीनियर यांचा कारमध्येच मृत्यू

गायक क्यूबा गुडिंग सीनियर यांचा कारमध्येच मृत्यू

ल गु्रपचे प्रसिद्ध गायक क्यूबा गुडिंग सीनियर त्यांच्या कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. ते ७२ वर्षांचे होते. वॅराएटी डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, कॅलिफोर्नियाच्या वुडलॅण्ड हिल्स परिसरात गुडिंग सीनियर मृत अवस्थेत असल्याची माहिती समजली. तेव्हा सगळ्यांची एकच तारांबळ उडाली. काही क्षणातच डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले. डॉक्टरांनी त्यांना कृत्रिम श्वास दिला, परंतु तोपर्यंत उशिरा झाला होता. त्यांच्या शरीराने उपचारासाठी कुठलाच प्रतिसाद दिला नसल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले. 



लॉस एंजेलिसच्या अग्निशमन विभागाच्या प्रवक्त्याने त्यांना घटनास्थळीच मृत घोषित केले. गुडिंग सीनियर १९७२ मध्ये आलेल्या ‘एव्रीबडी प्लेज द फूल’ या गाण्यामुळे लोकप्रिय झाले होते. ते ‘द मॅन इंग्रीडियंट’ नावाच्या बॅण्डचे प्रमुख होते. दरम्यान याप्रकरणी पोलीस तपास करीत असून, त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहे. 



त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याचा तपास पोलीस करीत असून, हा घातपात तर नसावा ना याबाबतचीही शक्यता पडताळून पाहिली जात आहे. दरम्यान हृदयविकारामुळेदेखील त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Web Title: Death in singer Cuba Gooding Sr.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.