ब्रेक-अपनंतर डकोटा जॉन्सनला वाटतेय समलैंगिक आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 13:54 IST2017-01-15T13:54:58+5:302017-01-15T13:54:58+5:30

प्रेमभंगाचे दु:ख खूप वेदनादायक असते. प्रेमात उजळून निघालेल्या मनावर बे्रक-अपचे ओरखडे दीर्घकाळ ताजे राहतात. अशावेळी मनात विचारांचे काहुर माजते, ...

Dakota Johnson feels gay attraction at break-up | ब्रेक-अपनंतर डकोटा जॉन्सनला वाटतेय समलैंगिक आकर्षण

ब्रेक-अपनंतर डकोटा जॉन्सनला वाटतेय समलैंगिक आकर्षण

रेमभंगाचे दु:ख खूप वेदनादायक असते. प्रेमात उजळून निघालेल्या मनावर बे्रक-अपचे ओरखडे दीर्घकाळ ताजे राहतात. अशावेळी मनात विचारांचे काहुर माजते, स्वत:बद्दल शंकाकुशंका तपासल्या जातात. डकोटा जॉन्सन या हॉलीवूड अभिनेत्रीचे गेल्या वर्षी ब्रेक-अप झाले आणि ती अद्यापही त्यातून सावरलेली दिसत नाहीए.

मागच्या जून महिन्यात तिचे मॉडेल व गायक असणाऱ्या मॅथ्यू हिटसोबत प्रेमसंबंध संपूष्टात आले. तेव्हापासून ती सिंगल असून एका मुलाखतीमध्ये म्हणाली की, ‘मला आता प्रेमाची खूप भीती वाटत आहे. त्यामुळे मी समलैंगिक रिलेशनशिपचा गांभीर्याने विचार करीत असून त्याविषयी माझ्या मनात कुतूहल आहे.’

पुढच्या महिन्यात तिचा ‘फिफ्टी शेड्स डार्कर’ हा चित्रपट रिलीज होत असून नुकतेच ती ‘व्होग’ या आंतरराष्ट्रीय मॅगझीनच्या कव्हरपेजवर झळकली. यावेळी तिने चित्रपटातील नग्नता, लैंगिकता आणि प्रेम याविषयी मनमोकळे विचार मांडले. मॅथ्यू आणि डकोटाचे नाते दोन वर्षे टिकले. त्यानंतर त्यांचे ब्रेक-अप झाले.

नात्यातील दुराव्याचे कारण स्पष्ट करताना तिने सांगितले की, ‘काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात, सर्वच काही आपल्या हातात नसते. नातेसंबंधात मला नेहमीच अपयश आले आहे. कोणाशी केवळ ठेवायचे म्हणून मी नाते ठेवू शकत नाही. कॅज्युअल रिलेशनशिपचा फंडा मला कधी जमलाच नाही. त्यामुळे प्रेमभंगानंतरची माझी स्थिती खूप वाईट असते.’

Fifty Shade darker
फिफ्टी शेड्स डार्कर

चित्रपटांतील नग्नतेविषयी ती म्हणते की, ‘चित्रपटाच्या पटकथेनुसार या सर्व गोष्टी आवश्यक असतात. ‘फिफ्टी शेड्स डार्कर’सारख्या कामूक आणि लैंगिक कल्पनाविलासी चित्रपटात तर नग्नता खूप महत्त्वपूर्ण भाग आहे. स्पष्टच बोलायचे तर, सेक्स करताना कपडे घालत नसतात. त्यामुळे असे सीन्स चित्रित करताना नग्नता दाखवणे गरजेचे असते.’

समलैंगिकते विषयीचे आकर्षण तिला ‘फिफ्टी शेड्स’ चित्रपटांमुळे  निर्माण झाल्याचे ती मान्य करते. ती म्हणते, ‘मला तरुण मुलींविषयी फार आकर्षण वाटते. लैंगिक भावनांच्या टप्प्यावर नुकतेच पोहचलेल्या मुलींकडे मी आकर्षित होते. त्यामुळे समलैंगिकतेचा अनुभव घेण्यास मी उत्सुकत आहे.’

Web Title: Dakota Johnson feels gay attraction at break-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.