​मेगन फॉक्सचा बाळासोबत कूल सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 17:34 IST2016-10-29T17:34:38+5:302016-10-29T17:34:38+5:30

सेलिब्रेटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही निवडक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सोशल मीडियाद्वारे फॅन्सदेखील आपल्या आवडत्या कलाकारांशी जोडलेले असतात. ...

Cool Selfie with Megan Fox baby | ​मेगन फॉक्सचा बाळासोबत कूल सेल्फी

​मेगन फॉक्सचा बाळासोबत कूल सेल्फी

लिब्रेटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही निवडक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सोशल मीडियाद्वारे फॅन्सदेखील आपल्या आवडत्या कलाकारांशी जोडलेले असतात. मेगन फॉक्स अशीच सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्ह स्टार आहे. नुकतेच तिने आपल्या दोन महिन्याच्या गोंडस मुलासह एका सेल्फी काढून इन्स्टाग्रामवर शेअर केला.

३० वर्षी मेगनने आॅगस्ट महिन्यात या बाळाला जन्म दिला होता. त्याचे नाव जर्नी रिव्हर ग्रीन असे ठेवण्यात आले आहे. आईप्रमाणेच बाळेचे निळे डोळे आहेत. पलंगावर झोपून काढलेला हा फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. 

तिचा पती आणि पूर्व ‘बेव्हर्ली हिल्स, ९०२१०’ स्टार ब्रायन आॅस्टिन ग्रीन असून त्यांचा हा तिसरा मुलगा आहे. दाम्पत्याची दोन्ही मोठी मुले चार आणि दोन वर्षांची आहेत.

                                Megan Fox Baby

विशेष म्हणजे दहा वर्षांच्या संसारानंतर मेगनने आॅगस्ट २०१५ मध्ये ब्रायनपासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात पेपर दाखल केले. परंतु अद्याप तरी दोघांनी कायमचे वेगळे झाल्याचे अधिकृतरीत्या मान्य केलेले नाही.

Web Title: Cool Selfie with Megan Fox baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.